संत्री दाखवून ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृतीने नवा वाद, कोण- कोणत्या जाहिराती वादग्रस्त ठरल्या

अनेकदा क्रिएटीव्हीटीच्या नावाखाली केलेल्या जाहीरातीतून वाद निर्माण झालेले आहेत. महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर आजाराची जनजागृती करण्यासाठी संत्री फळांचा वापर केल्याने वाद निर्माण झाला आहे.

संत्री दाखवून ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृतीने नवा वाद, कोण- कोणत्या जाहिराती वादग्रस्त ठरल्या
New controversy with breast cancer advertisement in Delhi Metro
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 10:48 PM

दिल्ली मेट्रोत महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर विषयी जनजागृती करण्यासाठी संत्र्याचा वापर केल्याने या जाहीराती वरुन वाद निर्माण झाला आहे. youwecan च्या एआय जनरेटेड जाहीरीतीत महिलांना संत्री पकडलेले दाखविले आहे. आणि जाहीरातील दर महिन्याला आपली संत्री तपासा असा सल्ला इंग्रजीतून देण्यात आला आहे. त्यामुळे लोकांनी यावर टीका केली आहे. दिल्ली मेट्रोत लावलेल्या या जाहीरातींनी ब्रेस्ट कॅन्सर सारख्या गंभीर विषयाचे महत्व कमी केले आहे. जाहीरात क्रिएटीव्ह बनविण्याच्या नादात एका गंभीर विषयाची टवाळकी केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.परंतू जाहीरातीतून वाद होण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही.

‘शॉट तो मारा होगा’

काही दिवसांपूर्वी बॉडी स्प्रे ब्रॅंड लेयरच्या शॉट डियोची जाहिरातीची भाषा आणि महिलेचा त्यासाठी केलेला वापर वादग्रस्त ठरला होता. सोशल मिडीयावर या जाहीरातीला तयार करणाऱ्या कंपनीला ट्रॉल करण्यात आले होते. ही जाहीरात बलात्काराला प्रोत्साहन देणारी असल्याची टीका त्यावेळी झाली होती. या जाहीरातीत तीन मुले दिसतात. तिघे जण शॉपिंग सेंटरला जातात. तेथे तीन परफ्युम ठेवलेले असतात. तेथे एक मुलगी देखील उभी असते. ती मुले आपसात चर्चा करतात की आपण तर चार आम्ही आहोत आणि शॉट केवळ एक आहे. कोण शॉट लेगा. हे ऐकूण मुलगी पाठी वळते. ती घाबरलेली दाखविली आहे. तिच्या चेहऱ्यावर राग आहे. अशाच प्रकारे या ब्रॅंडच्या अन्य जाहीरातीत ‘शॉट तो मारा होगा’ अशी टॅग लाईनची भाषा वापरली होती. वाद निर्माण झाल्यानंतर ही माहिती आणि प्रसारण खात्याने या जाहीराती हटवल्या होत्या.

डाबर कंपनीला आपली समलैंगिक जोडप्यांचा करवॉ चौथची जाहीरात मागे घ्यावी लागली होती. डाबरचा कॉस्मेटिक ब्रॅंड फेम च्या जाहीरातीत दोन महिला करवॉं चौथ साजरा करताना एकमेकींचा चेहरा चाळणीतून पाहातात असे दाखविले होते. मध्य प्रदेशातील भाजपा नेता नरोत्तम मिश्रा यांनी कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर ही जाहीरात मागे घेतली होती.

फॅब इंडियाने तीन वर्षांपूर्वी कपडे आणि दिवाळी यांच्या थीमवर एक केलेली जाहीरात वादग्रस्त झाली होती. या ‘जश्न-ए-रिवाज’ नावाने दिवाळी या हिंदू सणाचे मुस्लीमीकरण करण्याचा आरोप या जाहीरातीवर झाला होता. तसेच साल 2020 मध्ये ज्वेलरी ब्रॅंड तनिष्कने केलेल्या जाहीरातीने वाद निर्माण झाला होता. लोकांनी या ज्वेलरी ब्रॅंडवर ‘लव जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला होता. त्यावेळी ट्वीटरवर #BoycottTanishq ट्रेंड झाला होता. या जाहीरातीत एक मुस्लीम कुटुंब हिंदु सुनेच्या ओटी भरणाचा कार्यक्रम करताना दाखविली होती. तसेच कल्याण ज्वेलर्सच्या जाहीरातीवरुन वाद झाला होता. यात एक बुजुर्ग व्यक्ती ( अमिताभ बच्चन ) इमानदार दाखवले होते. जाहीरातीतील बॅंक कर्मचाऱ्यांना वाटते ते पेन्शनसाठी आले आहेत ते त्यांच्याशी नीट वागत नाहीत. दीड मिनिटांच्या या जाहीरातीने वाद झाला. बॅंक युनियननी या जाहीरातीने बॅंक कर्मचाऱ्यांबद्दल अविश्वास तयार होईल असे सांगत बंदीची मागणी केली होती.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.