नवी दिल्ली : कोरोना विषाणूची नवीन प्रजाती आढळून आल्यानंतर ब्रिटन येथून आलेले तब्बल 20 जण (New Corona Strain 20 Tested For COVID-19 Positive) कोरोना संक्रमित असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारत सरकारने युकेहून (UK) येणाऱ्या लोकांसाठी कठोर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये विमानतळावर प्रत्येकाची RT-PCR चाचणी करणे अनिवार्य असेल. निती आयोगचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल यांनी मंगळवारी सांगितलं, की याबाबत घाबरण्याची गरज नाही. पण आणखी सतर्क राहण्याची गरज आहे (New Corona Strain 20 Tested For COVID-19 Positive).
“भारतात आतापर्यंत याप्रकारचा विषाणू आढळून आलेला नाही आणि त्याच्या स्वरुपातही कुठला महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणुच्या (SARS-CoV-2 Strain) नव्या स्वरुपाने लशीच्या विकासावर कुठलाही परिणाम पडणार नाही”, असं त्यांनी सांगितलं.
भारताने 23-31 डिसेंबरपर्यंत ब्रिटन येथून येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. ब्रिटन येथून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर पाळत ठेवली जाणार आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या 20 पॉझिटिव्ह लोकांमध्ये सोमवारी रात्री दिल्लीत लँड करणाऱ्या 6, रविवारी रात्री कोलकाता येथे येणाऱ्या 2, मंगळवारी अहमदाबाद येथे येणाऱ्या 4 आणि आज अमृतसरला आलेल्या एका क्रू मेंबरचा समावेश आहे. हे सर्व लोक एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून भारतात आले होते.
“विषाणूचं रुप बदलल्याने याच्या उपचारासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विशेषत: देशात तयार करण्यात येणाऱ्या लसींवर (Corona Vaccine) याचा काहीही परिणाम होणार नाही. पॅटर्न बदलल्यामुळे व्हायरस अधिक संक्रामक होऊ शकतो. यामुळे जलद गतीने संसर्ग पसरण्याची शक्यता आहे”, असं व्ही के पॉल यांनी सांगितलं.
“हे देखील सांगितलं जात आहे की आता हा विषाणू 70 पट जास्त संसर्ग पसरवतो. त्यामुळे एका प्रकारे याला ‘सुपर स्प्रेडर’ म्हणू शकतो. पण, यामुळे मृत्यू, रुग्णालयात भर्ती होणे किंवा खूप आजारी पडणे याचा धोका वाढत नाही. चिंतेची बाब म्हणजे तो लोकांमध्ये अधिक जलद गतीने संसर्ग पसरवतो.” याबाबत व्ही. के. पॉल यांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, नियमांचं काटेकोरपणे पालन करा, असं आवाहन त्यांनी केलं.
New Corona Strain 20 Tested For COVID-19 Positive
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना
मार्गदर्शक सूचना भाग 1
कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन भारतात कुठेही आढळलेला नाही, घाबरण्याची गरज नाही : निती आयोग#CoronavirusStrain #coronavirus #newcoronavirusstrain #CoronaVaccine https://t.co/brHWZy4MlV
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020
New Corona Strain 20 Tested For COVID-19 Positive
संबंधित बातम्या :
भारतात 69 टक्के लोक म्हणतात, लसीकरणाची गरज नाही!, जाणून घ्या काय आहे कारण?
नव्या कोरोना लसीचा धसका?, थांबा..! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला बघा, निर्णय घ्या!
कोरोनाच्या नव्या प्रजातीवर ‘ही’ लस प्रभावी ठरणार?, वाचा सविस्तर
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनशी भारताची लढाई, केंद्र सरकारच्या गाईलाईन्स वाचल्या का?