AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी भ्रष्टाचारी असेल तर जगातला कुणीही इमानदार नाही, अरविंद केजरीवाल यांचा संताप, काय दिला इशारा?

पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी दिल्लीतील अबकारी धोरणाचं समर्थन केलं. ते म्हणाले, ' हे धोरण लागू झालं असतं तर भ्रष्टाचार संपुष्यात आला असता.

मी भ्रष्टाचारी असेल तर जगातला कुणीही इमानदार नाही, अरविंद केजरीवाल यांचा संताप, काय दिला इशारा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 3:10 PM

नवी दिल्ली : मद्यविक्री धोरणातील (Excise policy) कथित घोटाळ्याच्या आरोपाखाली दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांना समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी केजरीवाल यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. रविवारी सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावलंय. मी सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार, असं केजरीवाल म्हणाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते, केजरीवाल भ्रष्टाचारी असेल तर जगातील कोणतीही व्यक्ती अशी नसेल जी भ्रष्टाचारात आकंठ बुडाली नसेल. असं वक्तव्य केजरीवाल यांनी केलंय. केजरीवाल प्रामाणिक नसेल तर जगात कुणीही प्रामाणिक नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलंय. तसंच देशाच्या मागील ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या पक्षाला अशा प्रकारे टार्गेट केलं जातंय, असा आरोप केजरीवाल यांनी केलाय.

पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, ‘ आधी नंतर थ्रीला अरेस्ट केलं. नंतर नंबर २ ला अरेस्ट केलं. हे सगळं करण्यामागचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून माझी मानगूट पकडायची आहे. हे सगळं विनाकारण घडत नाहीये. यामागे एक मोठं कारण आहे. आम्ही देशातील जनतेला एक आशेचा किरण दाखवलाय. तोच आशेचा किरण नष्ट करण्यासाठी केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला हे संपवायला निघालेत.

गुजरातमध्ये मागील ३० वर्षांपासून यांचं सरकार आहे. मात्र एकही शाळा व्यवस्थित नाहीये. फोटो काढण्यासाठीही स्वच्छता केलेली नाही, असा आरोप केजरीवाल यांनी केलाय. मोदींना एका शाळेत फोटो काढायचा होता. तर एका तंबूत सगळी व्यवस्था करण्यात आली. इकडे दिल्लीतील सगळ्याच शाळांचं स्वरुप आम्ही बदललंय. देशानं हे पाहिलंय. त्यामुळे आता देशाला आम आदमी पार्टीकडून खूप अपेक्षा आहेत.

ईडी आणि सीबीआयवर आरोप करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, एकानंतर एक व्यक्ती ताब्यात घेतला जातोय. मारहाण करून दबाव आणला जातोय. दिल्लीतील राजकीय नेत्याचं नाव घेण्यासाठी ते दबाव आणतायत.

पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी दिल्लीतील अबकारी धोरणाचं समर्थन केलं. ते म्हणाले, ‘ हे धोरण लागू झालं असतं तर भ्रष्टाचार संपुष्यात आला असता. आता पंजाबमध्ये हेच धोरण लागू करण्यात आलाय. तेथील ५० टक्के महसूल वाढलाय. दिल्लीत केंद्र सरकारने हे धोरण लागू करू दिलं नाही. मात्र पंजाबमध्ये यांचं काही चालत नाही, त्यामुळे तिथे हे धोरण लागू करता आलं..

अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणी सीबीआयचं समन्स आलं असून उद्या जे सीबीआयच्या कार्यालयात जाऊन जबाब नोंदवतील.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.