Corona | नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरा, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे वक्तव्य केले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क हाच सध्या एकमेव उपाय असल्याचे जैन यांनी सांगितले. (New Delhi Health Minister Satyendra Jain third corona waive started in Mask is only option to prevent corona)

Corona | नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरा, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
होळीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमन्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी नेगेटिव्ह आली तरच चाकरमन्यांना आपल्या गावात प्रवेश मिळेल.
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 2:51 PM

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे वक्तव्य केले आहे. दररोजच्या वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आतापर्यंतची वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे, असं सत्येंद्र जैन म्हणाले. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क हाच सध्या एकमेव उपाय असल्याचे जैन यांनी सांगितले. (New Delhi Health Minister Satyendra Jain third corona waive started in Mask is only option to prevent corona)

आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी नवी दिल्लीत सरकारनं कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या वाढवली असल्याची माहिती दिली. मात्र, कोरोना रुग्णांसाठी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याचे नियोजन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना रुग्ण संख्या लवकरच कमी होणार

नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट सुरु असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, लवकरच कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, अशी आशा सत्येंद्र जैन यांनी व्यक्त केली. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला नागरिकांची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचही आरोग्यमंत्री जैन म्हणाले. काही लोकांना मास्क नाही घातला तर काही होत नाही, असं वाटतं हे चुकीचे आहे, असंही जैन म्हणाले.

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज साधारणपणे 7 हजार कोरोना रुग्ण वाढत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी 500 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.

दिल्ली सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये 685 कोरोना बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून खासगी रुग्णालयामधील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. राज्य सरकारच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्टानं स्थगिती दिली. यानंतर दिल्ली सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

“दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत कोरोनाची ही तिसरी लाट आहे, असंही म्हणता येईल”, असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चार दिवसांपूर्वी केले होते. दिल्लीत कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यात संक्रमणाचा वेग वाढला. दिल्लीत 28 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा 5 हजार 673 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 2 नोव्हेंबर वगळता दररोज पाच हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळत आहेत.

संबंधित बातम्या :

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; फटाक्यांवर कडक निर्बंध, पर्यावरणपूरक फटाक्यांनाही नो एन्ट्री

दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, नव्या बाधितांमध्ये प्रचंड वाढ : अरविंद केजरीवाल

(New Delhi Health Minister Satyendra Jain third corona waive started in Mask is only option to prevent corona)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.