“अब आप एक ट्रोल तक सीमित हो चुके हैं”; राहुल गांधी यांना काँग्रेसच्या जुन्या नेत्यानेच सुनावलं…

काँग्रेस या प्रकरणाची जेपीसी चौकशी करण्याच्या मागणीवर ठाम असल्यामुळेच संसद जवळपास संपूर्ण अधिवेशन ठप्प झाली होती.

अब आप एक ट्रोल तक सीमित हो चुके हैं; राहुल गांधी यांना काँग्रेसच्या जुन्या नेत्यानेच सुनावलं...
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 10:50 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी अदानींवर प्रश्न विचारताना सिंधिया यांच्यासह अनेक भाजप नेत्यांची नावे लिहिली होती. त्यामुळे सिंधिया यांनी ट्विट करून राहुल गांधींना ट्रोल केले आहे.

सिंधिया यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत राहुल गांधी आता ट्रोल करणाऱ्यांपुरतेच मर्यादित राहिले असल्याचे म्हटले आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून मुख्य मुद्द्यांवरून लोकांचे लक् विचलित करण्याऐवजी तुम्ही प्रश्नांची उत्तरे का देत नाही, असा सवाल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी अदानी वादात भाजप नेत्यांची नावं ओढत त्यांनी केलेल्या ट्विटमुळे राहुल गांधी यांच्यावर भाजपने नेत्यानी जोरदार निशाणा साधला आहे.

त्यामुळे काल आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला होता. नॅशनल हेराल्ड आणि बोफोर्स सारख्या घोटाळ्यांचा पैसा कुठे गेला हे आम्ही तुम्हाला कधीच विचारले नाही असं ट्विट करून त्यांनी तो जुना वाद उखरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांना थेट इशारा देत आता आम्ही तुम्हाला कोर्टात भेटू असंही त्यांनी त्यांना म्हटले आहे.

हिंडनबर्गच्या अदानीबाबतच्या अहवालानंतर काँग्रेसकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये गुंतवलेले 20 हजार कोटी रुपये कोणाकडे आहेत, असा सवाल राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने सरकारला विचारण्यात येत आहेत. यावेळी अदानी प्रकरणावरून संसदेत बराच गदारोळही उठला होता.

काँग्रेस या प्रकरणाची जेपीसी चौकशी करण्याच्या मागणीवर ठाम असल्यामुळेच संसद जवळपास संपूर्ण अधिवेशन ठप्प झाली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.