कोकणातील आंदोलन पेटलं, संजय राऊत भडकले, कोकण कनेक्शन सांगत दिलं खुलं आव्हान, सरकारवर घणाघाती टीका

| Updated on: Apr 28, 2023 | 4:38 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रत्नागिरी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारसह केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

कोकणातील आंदोलन पेटलं, संजय राऊत भडकले, कोकण कनेक्शन सांगत दिलं खुलं आव्हान, सरकारवर घणाघाती टीका
Image Credit source: Google
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रत्नागिरी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षण प्रकरणी आंदोलक आणि पोलिसांत झालेल्या झटापटीवरुन आक्रमक झाले आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्यानंतर सर्वेक्षण सुरू असल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आहे. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल करत थेट केंद्र सरकारवर निशाणा साधत शिंदे-फडणवीस सरकारला प्रश्न विचारले आहे. संजय राऊत यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला खुलं आव्हान देत असतांना जुना इतिहास सांगितला आहे. त्यामुळे पुढील काळात हे आंदोलन अधिकच पेटणार असं चित्र निर्माण झाले आहे.

संजय राऊत म्हणाले, पोलिसांनी रत्नागिरी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वेक्षण करतांना अमानुष लाठीचार्ज केला आहे. महिला आणि लहान मुलांना बदडून काढलं आहे. खासदार विनायक राऊतांना अटक केलीय. एकीकडे चर्चेतून तोडगा काढायचं सरकार म्हणतेय आणि दुस-या बाजूला आंदोलकांना बदडून काढले जात आहे.

तुम्ही गोळ्या झाडून रक्त सांडून तिथे रिफायनरी उभी कराल, कारण हा दिल्लीवरून आलेला आदेश आहे. खाजगी लोकांनी तिथे जमीन खरेदी मोठ्या प्रमाणावर केली आहे. प्रत्येकानं फायदा तोटा हिशोब केला आहे. ही लोकशाही नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मोगलाईचा आदेश देऊन ते परदेशात गेले.

हे सुद्धा वाचा

शिवरायाच्या भूमीत महिलांना मारहाण केली जातेय. अन् तिथे मॅारिशसला शिवाजी महारांजांच्या अनावरनासाठी जाताय. हा कोकणी जनतेवरचा अत्याचार सहन केले जाणार नाही, कारण शिवसेनेवर कोकणी जनतेने प्रेम केल आहे. त्यामुळे आम्ही आंदोलकांच्या बरोबर आहोत असेही राऊत म्हणाले.

गृहमंत्री मॅारिशसला बसून आदेश देताहेत. मुख्यमंत्र्यांची इच्छा असती तर आदेश थांबले असते. दिल्लीतल्या मोगलांचा आदेश आहे. यापूर्वी कोकणात अशा पद्धतीनं आंदोलन झालं नाही. स्टरलाईट , नाणार, जैतापूर आंदोलन झाले पण जनतेवर अमानुष मारहाण यापूर्वी कधी झाली नाही.

आंदोलक पाकिस्तान मधून आलेत का? ते रशियातून आले आहेत का? आंदोलनकर्ते रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरील नाहीत. आपल्या नातेवाईकांवर अत्याचार होऊ नये असे वाटते म्हणून ते आले होते. जमीनी कोणाच्या नावावर आहे ते उदय सामंत यांनी सांगावे असेही आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

आमच्या भूमिपुत्रांच्या डोकी फोडताय? कोणताही विनाशकाला प्रकल्प टिकला नाही. उद्या गोळ्या झाडतील. परदेशी कंपन्या आहेत त्यात व्यवहार झाले आहेत. हे कमिशन वर जगताहेत. उदय सामंतांनी कोणाची सुपारी घेतलीय ते स्पष्ट करावं असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.