मुंबई : जर तुमच्याकडे दुचाकी म्हणजेच बाईक किंवा स्कूटर असेल, किंवा चारचाकी वाहन असेल तर, विना परवाना वाहन चालवणे बेकायदेशीर आहे, हा नियम आपल्याला माहित असेल. वाहन चालवण्याचा परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्सचा ओळखपत्र म्हणून देखील वापर केला जातो. 18 वर्ष पूर्ण झाली की, लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. यासाठी भल्या मोठ्या रांगेत उभे राहावे लागते. ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची ऑनलाईन प्रक्रिया अजूनही बर्याच लोकांना माहिती नाही (New Driving License application online process).
बर्याच लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स तर हवे असतात, परंतु त्यासाठी त्यांना रांगेत उभे राहायचे नसते. अशा परिस्थितीत, आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा सोपा मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रथम, ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना लागणाऱ्या कागदपत्रांची यादी पाहूया…
आपल्याकडे स्थायी पत्त्यासाठी मतदार कार्ड, आधार कार्ड, विजेचे बिल, टेलिफोन बिल, रेशन कार्ड किंवा सरकारी कर्मचार्यांनी दिलेले कोणतीही ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यानंतर, आपल्या वयाच्या पुराव्यासाठी, आपल्याकडे दहावी बोर्डाची आवश्यक गुणपत्रिका, जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड असले पाहिजे. जर, ही कागदपत्रे आपल्याकडे नसतील तर दंडाधिकाऱ्यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांच्या मदतीने आपण ऑनलाईन वाहन परवान्यासाठी अर्ज करू शकता.
आपल्याला उत्तीर्ण घोषित केल्यास आपल्या अर्जास पूर्ण मान्यता दिली जाईल आणि पुढील काही दिवसांत आपल्याला वाहन चालवण्याचा परवाना दिला जाईल.
(New Driving License application online process)
तुम्हीही चालवू शकता परदेशात गाडी, अमेरिकेसह ‘या’ देशांत भारतीय ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ला मान्यता!https://t.co/DmBp5XAu68#DrivingLicence
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020