AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Labour Laws : कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! सुट्यांबाबत आला नवीन कायदा, काय होईल फायदा

New Labour Laws : कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्यासाठी अनेक फंडे कंपन्या वापरतातच. अनेक कर्मचाऱ्यांना मुळात कायदेच माहिती नसल्याने ते कोणतीच ओरड करत नाही. पण आता नवीन कायद्याने कंपन्यांवर काही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. हा बदल कर्मचाऱ्यांना फायदेशीर ठरु शकतो.

New Labour Laws : कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! सुट्यांबाबत आला नवीन कायदा, काय होईल फायदा
| Updated on: Sep 05, 2023 | 4:26 PM
Share

नवी दिल्ली | 5 सप्टेंबर 2023 : देशात सध्या कामगार क्षेत्रात एक वर्षापासून नवीन कामगार कायदे चर्चेत आहेत. या कायद्यात मोठा उलटफेर होणार आहे. चार नवीन कामगार कायद्याने अमुलाग्र बदल होतील, असा एक अंदाज आहे. अर्थात या कायद्याची रुपरेषा, धोरणं, नवीन तरतुदी यांची चर्चा सुरु आहे. काही कामगार संघटना विरोधाच्या भूमिकेत तर काही स्वागताच्या तयारीत आहेत. या कायद्याची संपूर्ण माहिती समोर येईल आणि तो लागू होईल. त्यावेळी भूमिका बदलू शकते. अथवा भूमिकेला धार येऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून हे 4 नवीन कामगार कायदे (New Labour Laws) लागू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या कायद्यात कमी टेक होम सॅलरी, ईपीएफ खात्यातील भरीव योगदार, एका दिनदर्शिका वर्षातील पगारी रजा, अर्जित रजा यांच्याविषयी कामगारांमध्ये उत्सुकता आहे. यातील काही तरतुदी त्यांच्या पथ्यावर पडणाऱ्या आणि त्यांना बचतीची सवय लावणाऱ्या ठरतील.

Paid Leave चे धोरण

सध्याच्या कायद्यात पगारी सुट्टीविषयीचे धोरण ठरलेले आहे. एका कॅलेंडर वर्षात 30 दिवसांपेक्षा अधिक पगारी सुट्टी घेऊ शकत नाही. पण नवीन कायद्यात या तरतुदीला छेद देण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्याने यापेक्षा अधिक सुट्टी घेतल्यास ही अतिरिक्त सुट्टीचा पगार कंपनीला करावा लागेल. पण या तरतुदीत वरिष्ठ पदावरील, व्यवस्थापकीय पदावरील साहेबांचा समावेश नाही. कर्मचाऱ्यांसाठी ही तरतूद आहे.

कामगार जगताला प्रतिक्षा

व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणचे नियम, पगारासह अनुषंगिक लाभाचे नियम, औद्योगिक संबंधीचे कोड आणि सामाजिक सुरक्षेचा कोड याविषयीची प्रतिक्षा कामगार जगताला लागलेली आहे. हे नवीन चार कामगार कायद्यांना संसदेने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने त्यांची अधिसूचना काढली आहे. पण हे कायदे कधीपासून लागू होतील, हे जाहीर करण्यात आलेले नाही.

अतिरिक्त सुट्टीसाठी काय तरतूद

  1. केंद्र सरकारने हे कायदे लागू करण्याची तारीख जाहीर केली, त्यानंतर कंपनी, फॅक्टरी, संस्था यांना निर्धारीत मर्यादेत अर्जित सुट्यांविषयीच्या धोरणांचे पालन करणे अनिवार्य असेल. लीव्ह इनकॅशमेंटसाठी प्रति दिवसाच्या मुळ वेतनाचा आधार घेणार का, त्यात विशेष भत्ते, घराचे भाडे या गोष्टींचा लाभ अंतर्भूत असेल का, असे अनेक प्रश्न समोर येत आहे.
  2. OSH कोड अंतर्गत लीव्ह इनकॅशमेंटसंबंधी वेतन कोडची व्याख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार अतिरिक्त रजेवर किती वेतन मिळणार हे निश्चित होईल. यामध्ये घरभाडे, वाहन भत्ता, बोनस यांचा समावेश नसेल. तसेच याविषयी खास तरतूद असू शकते.
  3. विशेष म्हणून जे भत्ता बाजूला करण्यात आले आहे, ते सोडून इतर भत्यांचा समावेश करुन प्रति दिवसाच्या आधारे कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येईल. त्यासाठी पण मर्यादा असेल. आता कर्मचाऱ्याने यापेक्षा अधिक सुट्टी घेतल्यास ही अतिरिक्त सुट्टीचा पगार कंपनीला करावा लागेल, हे स्पष्ट होत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.