New Parliament Building Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार नवीन संसद भवनाचे उद्घाटन; जाणून घ्या कार्यक्रमाचे अचूक वेळापत्रक

राज्यसभा भारताचे राष्ट्रीय फुल कमळावर आधारित आहे. नवीन संसद भवनात संयुक्त अधिवेशनात 1272 लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

New Parliament Building Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार नवीन संसद भवनाचे उद्घाटन; जाणून घ्या कार्यक्रमाचे अचूक वेळापत्रक
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 1:27 AM

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ मंत्री, 25 राजकीय पक्षांचे सदस्य आणि धार्मिक नेत्यांसह अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सकाळी हवन व बहुधर्म प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात येणार आहे. तर दुपारी मुख्य सोहळ्याला सुरूवात होणार आहे. उद्घाटन सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी शासनाकडूनही तयारी पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नवीन संसद भवन तयार करण्यात आले आहे. संसद भवन तयार करण्यासाठी 971 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

जुन्या संसदेच्या तुलनेत त्यात अनेक अत्याधुनिक सुविधा बसवण्यात आल्या आहेत.तर नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरुन केले जाणार आहे.

असे असणार कार्यक्रमाचे वेळापत्रक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 7.15 वाजता विजय चौकात पोहोचणार आहेत.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ बांधलेल्या पंडालमध्ये सकाळी 7.30 वाजता पूजा .

सकाळी 8.30 वाजता पूजा समाप्त होणार आहे.

सकाळी 8.30 नंतर पंतप्रधान इतर मान्यवरांसह चेंबरला भेट देणार आहेत.

सकाळी 9 ते 9.30 या वेळेत प्रार्थना सभा होणार आहे.

सकाळी 9.30 नंतर पंतप्रधान प्रार्थना सभेसाठी रवाना होतील.

पाहुण्यांचे आगमन सकाळी 11.30 वाजता सुरू होणार आहे.

दुपारी 12.00 वाजता पंतप्रधान मान्यवरांसह मंचावर पोहोचणार आहेत.

दुपारी 12.07 वाजता राष्ट्रगीत होणार आहे.

दुपारी 12.10 वाजता उपराष्ट्रपतींचे भाषण होणार आहे

दुपारी12.33 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशासाठी दिलेला संदेश वाचला जाणार आहे.

दुपारी 12.38 वाजता विरोधी पक्षनेते राज्यसभेला संबोधित करणार आहेत.

दुपारी 12.43 वाजता स्पीकर जनतेला संबोधित करतील.

पंतप्रधान मोदी दुपारी 1.05 वाजता 75 रुपयांचे नाणे जारी करतील.

पंतप्रधान मोदींचे भाषण दुपारी 1.10 वाजता सुरू होणार आहे.

नवीन संसद भवनात लोकसभेतील 888 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर राज्यसभेत 348 खासदारांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यसभा भारताचे राष्ट्रीय फूल कमळावर आधारित आहे. नवीन संसद भवनात संयुक्त अधिवेशनात 1272 लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर या नवीन इमारतीत ‘संविधान सभागृह’ही तयार करण्यात आले आहे. याशिवाय संसद भवनात तुम्हाला अत्याधुनिक कार्यालयेही पाहायला मिळणार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.