गोव्यात करायचंय New Year चं सेलिब्रेशन ? मग आधी हे वाचा…

डिसेंबर महिना सुरू होतात, सर्वांनाच ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनचे वेध लागतात. बहुतांश जण 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी मोठमोठे प्लान्स आखत असतात. आता डिसेंबर संपायला काहीच दिवस उरले असून बऱ्याच लोकांनी न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी प्लानिंग सुरू केल असेल

गोव्यात करायचंय New Year चं  सेलिब्रेशन ?  मग आधी हे वाचा...
Follow us
| Updated on: Dec 05, 2023 | 10:55 AM

New Year 2024 celebration in Goa : डिसेंबर महिना सुरू होतात, सर्वांनाच ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनचे वेध लागतात. बहुतांश जण 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी मोठमोठे प्लान्स आखत असतात. आता डिसेंबर संपायला काहीच दिवस उरले असून बऱ्याच लोकांनी न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी प्लानिंग सुरू केल असेल. त्यातच यंदा 31 डिसेंबर हा रविवारी येत असल्याने शनिवार-रविवार असा वीकेंडचा शानदार प्लान बहुसंख्य लोकांनी केला असेल.

नव्या वर्षाचं सेलिब्रेशन म्हटलं की अनेकांना जीवाचं गोवा करायचं असतं. तिथे न्यू ईअर सेलिब्रेशनची धूमधाम असते. तुम्ही देखील असाच काहीसा प्लान आखला आहे का ? 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी तुम्हीही गोव्याला जाणार आहात का ? असं असेलं तर एक सेकंद थांबा आणि ही बातमी नक्की वाचा. कारण ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. कारण नववर्षा निमित्त दरवर्षी होणारा ‘सनबर्न म्यूजिक फेस्टिवल’ यंदा रद्द होऊ शकतो. हो, हे खरं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीच याबद्दल वक्तव्य केलं आहे. लोकांची इच्छा नसेल तर 31 डिसेंबर रोजी ‘सनबर्न म्यूजिक फेस्टिवल’ होणार नाही, असं ते म्हणाले. सिओलीम मतदारसंघातील भाजप आमदार डेलिलाह लोबो यांनी 31 डिसेंबर रोजी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला परवानगी देऊ नये असे आवाहन केले आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

कारण काय ?

‘सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल’ होऊ नये, असे जर लोकांनाच वाट असेल, तर त्याचे आयोजन कसे केले जाऊ शकते, असा सवाल मुख्यमंत्री सावंत यांनी विचारला. सिओलीम मतदारसंघातील भाजप आमदार डेलिलाह लोबो यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना 31 डिसेंबर रोजी ‘सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल’ला परवानगी न देण्याची विनंती केली होती. कारण त्यामुळे स्थानिक हॉटेल्सवर ताण पडेल आणि ट्रॅफिक जॅममुळे लोकांना मध्यरात्री ग्रुप इव्हेंटमध्ये जाणे कठीण होईल. म्हणूनच या फेस्टिव्हलला परवानगी देऊ नये असे लोबो यांचे म्हणणे आहे.

चार दिवस होणार कॉन्सर्ट

दरवर्षी डेलीलाह लोबो यांच्या मतदारसंघात ‘सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल’ होतो. यंदा हा फेस्टिव्हल तीन दिवसांऐवजी चार दिवस होईल, असे आयोजकांनी वेबसाईटवर नमूद केले आहे. 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत उत्तर गोव्यातील किनारी भागात हा कॉन्सर्ट होणार आहे. रात्री दहाच्या सुमारास ‘सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल’ बंद झाल्यास वाहतुकीची कोंडी होईल आणि पर्यटक स्थानिक हॉटेल्सपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, असे लोबो यांचं म्हणणं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.