नवरा नको गं बाई, मला मोबाईल हवा गं बाई ! लग्नानंतर 15 दिवसांतच नववधूने पतीला सोडले
नववधू सतत फोनला चिकटलेली असायची. या सवयीला कंटाळून तिचा पती आणि सासरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने ऐकलेच नाही.
पाटणा : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, असे आपण शाळेत शिकलो आहोत. पण आता त्यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती मोबाईलची ! लोक मोबाईलच्या (mobile) इतकी अधीन झाली आहेत की त्याच्यापुढे त्यांना इतर काहीही महत्वाचं वाटत नाही, आपली माणसंही नाहीत. अशीच एक घटना बिहारच्या (bihar) हाजीपूरमध्ये घडली आहे. ती ऐकून तुम्ही हैराण व्हाल.. सतत मोबाईल वापरू देत नाही, या शुल्लक कारणावरून येथे एका नववधूने (bride left husband) आपल्या पतीला सोडून माहेर गाठल्याची घटना घडली आहे. लग्नाला 15 दिवसंही उलटले नाहीत तोच त्या वधूने सासर सोडलं आणि ती माहेरी परतली.
रिपोर्ट्सनुसार, त्या नववधूची घरातील वडिलधाऱ्या मंडळीनींही समजूत घातली, पण तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. लग्न होऊन अर्धा महिनाही होत नाहीत तोच त्या वधून मोबाईल सोडण्यापेक्षा आपला नवरा सोडणचं पसंत केलं. हाजीपूरच्या लालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे. येथील इलियास नामक तरुणाचा काही दिवसांपूर्वी हाजीपूर येथील सबा हिच्याशी विवाह झाला. दोन्ही कुटुंबियांनी थाटामाटात लग्न लावून दिलं. मात्र मुलगी सासरी आल्यावर सतत फोनमध्ये बिझी असायची. ती दिवसभर इन्स्टाग्राम सह इतर सोशल मीडियाचा वपर करत फोनमध्येच डोकं खुपसून बसलेली असायची. त्यामुळे सबाच्या सासरचे लोक वैतागून गेले होते.
इलियास यालाही पत्नीची बायकोची ही सवय खटकू लागली. त्यानं तिला हटकायला सुरुवात केली. सासरचे इतर लोकही तिला त्यावरून बोलू लागले आणि मोबाईल जास्त वेल वापरू नकोस असं सांगायला लागले. मात्र सबा त्यामुळे संतापली. त्यातून पती-पत्नीमध्ये जोरदार वादावादी झाली.
भाऊ बंदूकच घेऊन आला
सबाने फोन करून तिच्या आई-वडिलांना सासरी बोलावलं. तिच्या माहेरच्यांनी तिला न समजातावता तिला डोक्यालवरच चढवले आणि तिच्या सासरच्या लोकांना दोष देऊ लागले. एवढेच नव्हे तर सबाचा भाऊ सरळ बंदूक घेऊन आला आणि त्याचा धाक दाखवून सासरच्या लोकांना मारहाणही केल्याचे समजते. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सबाचा भाऊ मोहम्मद याला अटक केली. यानंतर सबा सासरचं घर आणि नवरा सोडून तिच्या माहेरी परत गेली.