Virginity Test : नव्या नवरीची वर्जिनिटी टेस्ट; निकालानंतर आयुष्यचं झालं बरबाद
11 मे रोजी लग्न पीडितेचे झाले होते. समाजाच्या 'कुकडी पद्धती'नुसार लग्नानंतर तिची कौमार्य चाचणी घेण्यात आली. यात ती अपयशी ठरली. नातेवाइकांनी विवाहितेकडे चौकशी केली असता, लग्नापूर्वी तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले.
भिलवाडा : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाही, अद्यापही आपल्या देशात स्त्रियांवरील अत्याचार आणि प्रथा-परंपरेचे जोखड संपलेले नाही. अजूनही काही राज्यांत महिलांना क्लेषदायक अशी कौमार्य चाचणी करण्याचीा प्रथा सुरु आहे. अशा चाचण्यांमधून येणाऱ्या निष्कर्षांची सुनावणी भर जात पंचायतीत करण्यात येते. देशात न्याय व्यवस्था उपलब्ध असतानाही, जात पंचायती अशा खटल्यांचा निकाल देतात. अपराधी ठरवल्या जाणाऱ्या स्त्रियांचे आयुष्य या सगळ्या प्रक्रियेत उद्धव होते. अशीच एक घटना समोर आली आहे ती राजस्थानमध्ये( Rajasthan) कौमार्य चाचणीच्या(Virginity Test) निकालानंतर नव्या नवरीचं आयु्ष्यचं बरबाद झालं आहे.
राजस्थानमधील मेवाडच्या भीलवाडा जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे आजही लग्नानंतर नव विवाहितेची ‘कौमार्य चाचणी’ केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक भाषेत या प्रथेला ‘कुकडी’ची प्रथा म्हणून संबोधले जाते.
या गावातील खाप पंचायतीकडून नव विवाहितेंची ‘कौमार्य चाचणी’ घेतली जाते. या चाचणीत एक नव विवाहित महिला अपयशी ठरली. यामुळे सासरच्या मंडळींनी या विवाहितेला नांदवण्यास नकार देत तिला घरातून बाहेर काढले. यानंतर पंचायतीने विवाहितेसह तिच्या कुटुंबीयांना शुद्धीकरणाच्या नावाखाली दहा लाखांचा दंड ठोठावला. दंड न भरल्याने विवाहितेचा सतत मानसिक छळ होत आहे. मागील पाच महिन्यांपासून ही विवाहित महिला हा सर्व त्रास सहन करत आहे.
‘कौमार्य चाचणीनंतर विवाहितेचा भूतकाळ समोर आला आहे. लग्नापूर्वी या विवाहितेवर बलात्कार झाला होता. भिलवाडा शहरातील सुभाष नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कौमार्य चाचणीनंतर सासरचे मंडळी, समाज आणि पंचायतीने विवाहितेचा एक प्रकारे छळच केला आहे.
पीडितेने पती आणि सासरच्यांविरुद्ध बागोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या सर्वांविरोधात दहा लाखांसाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
11 मे रोजी लग्न पीडितेचे झाले होते. समाजाच्या ‘कुकडी पद्धती’नुसार लग्नानंतर तिची कौमार्य चाचणी घेण्यात आली. यात ती अपयशी ठरली. नातेवाइकांनी विवाहितेकडे चौकशी केली असता, लग्नापूर्वी तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले.
पिडितेच्या तक्रारीनंतर तिच्या सासरच्या मंडळींना आणि समाजातील पंचांना पोलिसांनी ताकीद दिली होती. मात्र असे असतानाही 31 मे रोजी पुन्हा पंचायत बोलवण्यात आली. पंचायतीने पीडितेच्या कुटुंबियांना 10 लाखांचा दंड भरण्याचे आदेश दिले.
कुकडीच्या प्रथेमुळे अनेक तरुणींचे आयुष्य उद्धवस्त
राजस्थानमधील या कुकडीच्या प्रथेमुळे जिल्ह्यातील अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या प्रथेनंतर होणाऱ्या छळाला कंटाळून अनेक मुलींनी आत्महत्याही करत आपले आयुश्य संपवले आहे.