Tamilnadu Suicide : तामिळनाडूत पतीच्या घरात शौचालय नसल्यामुळे नवविवाहितेची आत्महत्या
रम्या एका खाजगी कंपनीत कामाला होती. रम्याच्या सासरच्या घरी शौचालय नव्हते. यामुळे ती वारंवार पती कार्तिकेयनला शौचालय असलेले घर घेण्यास सांगत होती. मात्र पती रम्याचे बोलणे टाळत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. अखेर पती कार्तिकेयनच्या घरात शौचालय नसल्यामुळे रम्या रागाने माहेरी निघून गेली.
तामिळनाडू : पतीच्या घरी शौचालय नाही म्हणून तामिळनाडूतील कुड्डालोर (Cuddalore)मध्ये नवविवाहित महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याचा आरोप आहे. रम्या(27) असे मृत महिलेचे नाव असून ती अरीसिपेरियनकुप्पम (Arisiperiyankuppam) येथील रहिवासी आहे. रम्याचा विवाह 6 एप्रिल रोजी कार्तिकेयन नावाच्या तरुणाशी झाला होता. जेव्हा ती सासरी आली तेव्हा तिला सासरच्या घरी शौचालय दिसले नाही. याबाबत तिने पतीशी अनेक वेळा चर्चा केली. यामुळे दोघांमध्ये वादावादीही झाली. रम्याची आई मंजुळा यांनी तिरुपतीरुपुलियुरमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे.
शौचालयावरुन पती-पत्नीमध्ये वाद होते
रम्या एका खाजगी कंपनीत कामाला होती. रम्याच्या सासरच्या घरी शौचालय नव्हते. यामुळे ती वारंवार पती कार्तिकेयनला शौचालय असलेले घर घेण्यास सांगत होती. मात्र पती रम्याचे बोलणे टाळत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. अखेर पती कार्तिकेयनच्या घरात शौचालय नसल्यामुळे रम्या रागाने माहेरी निघून गेली. त्यानंतर ती सासरी परत आलीच नाही, तिच्या आईसोबत माहेरी राहत होती. घटनेपूर्वीही रम्याने कार्तिकेयनला शौचालय असलेले घर शोधण्यास सांगितले. यादरम्यान दोघांमध्ये वादावादीही झाली. त्यानंतर सोमवारी रम्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या आईनेच तिला प्रथम पाहिले. त्यानंतर तिने तिला कुड्डालोरच्या सरकारी रुग्णालयात नेले. तेथून तिला चांगल्या उपचारासाठी पुद्दुचेरीच्या जिपमर येथे रेफर करण्यात आले. मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी रम्याची आई मंजुळाने तिरुपतीरुपुलियुरमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.