नेक्स्ट लेवल कॉन्फीडन्स अॅण्ड पोझ, भाजपच्या या मंत्र्याने केले राहुल गांधी यांच्या फोटोचं कौतूक
राहुल गांधी यांच्या फोटोसाठी भाजपाच्याच एका नेत्याने समाजमाध्यमावर तारीफों के पुल बांधल्यामुळे समाजमाध्यमावर भाजपाच्या चाहत्यांना इंगळी डसली आहे.
नवी दिल्ली : एकमेकांचे हाडवैरी असलेल्या भाजपा आणि कॉंग्रेस या पक्षांमध्ये सध्या विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे, त्यातच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लंडनमधील ‘देश की इज्जत उछालणाऱ्या’ व्यक्तव्यांनी तर सत्ताधारी भाजपात आगडोंब उसळला आहे, अशात भाजपा नागालॅंडच्या मंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यासाठी ‘तारीफोंके पुल’ बांधल्याने भाजप ‘आगबबुला’ झाला आहे. काय आहे नेमके प्रकरण पाहुया…
भारत जोडो यात्रेनंतर फारसा चमत्कार दाखवू न शकलेले राहुल गांधी यांनी लंडनच्या जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात गेस्ट लेक्चर देताना भारतीय लोकशाही संकटात असल्याचे म्हटले होते. या भाषणात त्यांनी सत्ताधारी भाजपाने आपल्या मोबाईलमध्ये इस्रायली पेगासस स्पायवेअर टाकले होते असा आरोप केला होता. इस्रायलमधील कंपनीने तयार केलेल्या स्पायवेअरने गेल्यावर्षी मोदी सरकार टीकेचे लक्ष्य ठरले होते. मोदी सरकारवर विरोधकांनी सडकून टीका केली होती. देशातील महत्त्वाचे नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर या हेरगिरी सॉफ्टवेअर द्वारे पाळत ठेवली जात आहे, असा आरोप त्यांनी केला होता.
हेच ते ट्वीट –
Stand up for what you believe in, even if it means you stand alone. pic.twitter.com/dV3fG4NfB9
— Congress (@INCIndia) March 6, 2023
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणामुळे पेगासस स्पायवेअरचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजपाचे नागालॅंड प्रमुख मंत्री तेमजेन इमना सोशल मिडीयावर ( socialmedia ) नेहमीच एक्टीव असतात. त्यांनी राहुल गांधी यांच्या लंडनमधील फोटोला ट्वीटरवर टॅग करीत ए बात तो मानने पडेगी, फोटो तो अच्छी आयी हैं, कॉन्फीडन्स अॅड पोझ नेक्स्ट लेव्हल मानना पडेगा ! अशा शब्दात त्यांचे कौतूक केले आहे. या अशा प्रकारे राहुल गांधी यांच्या तारीफों के पुल बांधल्यामुळे समाजमाध्यमावर भाजपाच्या चाहत्यांना इंगळी डसली आहे. त्यांनी या पोस्ट प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. भाजपा कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांच्याबद्दल तिरस्कार पूर्ण प्रतिक्रीयांची सवय असल्याने राहुल गांधीचे कौतूक चक्क भाजपा मंत्र्याने ट्विटरवर सळसळ सुरू झाली आहे.
कम से कम Caption तो खुद लिखा करो ? pic.twitter.com/YvHUyfKGZF
— Temjen Imna Along (@AlongImna) March 8, 2023
बाजू सावरण्याचा प्रयत्न
कॉंग्रेसच्या ट्वीटर हॅंडलवर कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांचा जोधपुरी सुटातील दाढी ट्रीम केलेला फोटो शेअर केला आहे. त्यात कॉंग्रेसने Stand up for what you believe in, even if it means you stand alone अशी विचार शेअर केला आहे. तुम्ही सत्याच्याच बाजूने उभे राहा, मग भले तुम्ही एकटे का असोत अशा अर्थाचे घोषवाक्य कॅप्शन म्हणून या फोटोला कॉंग्रेसने दिले आहे. त्यावर भाजपा मंत्र्यांने अरे फोटोला कॅप्शन तरी स्वत: ची वापरायची असा टोला लगावत बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत भाजपा कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.