Toll Plaza : टोलनाक्यावरील प्रतिक्षा संपली, NHAI ची मोठी तयारी, नवीन डिव्हाईस येणार दिमतीला, आता जास्त थांबावे नाही लागणार

NHAI Toll Plaza : आता टोल नाक्यावरील लांबच लांब रांगांमध्ये अडकावे लागणार नाही. फास्टॅग असतानाही मोठ्या टोल नाक्यांवर वाहनांची गती मंदावते. त्यावर आता अजून एक उपाय शोधण्यात आला आहे. एनएचएआयने सॉफ्टवेअर अपडेट करण्यास सुरुवात केली आहे.

Toll Plaza : टोलनाक्यावरील प्रतिक्षा संपली, NHAI ची मोठी तयारी, नवीन डिव्हाईस येणार दिमतीला, आता जास्त थांबावे नाही लागणार
लांबच लांब रांगेल लागेल ब्रेक
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 2:16 PM

पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक बाहेर पडतात. अनेक दूरचा पल्ला गाठण्यासाठी द्रुतगती महामार्गाचा वापर होतो. पण अनेकदा महामार्गावरील टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा पाहून अनेकांचा मूड ऑफ होतो. पण त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आता टोल नाक्यावरील प्रतिक्षा संपणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल नाक्यांवरील आयटी सिस्टिम आणि हार्डवेअरमध्ये मोठ्या बदलाव करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे फास्टॅगचा व्यवहार अधिक जलद गतीने होईल. टोल नाक्यावरील लागणाऱ्या वेळेत मोठी कपात होईल.

वेळेची होईल बचत

सध्या जी यंत्रणा वापरण्यात येते. त्यात वाहनावरील फास्टॅग रीड करण्यात बराच वेळ लागतो. कधी कधी फास्टॅगचा कोड रीड होत नाही. अशावेळी कर्मचाऱ्यांना हातातील डिव्हाईसचा वापर करावा लागतो. त्याआधारे फास्टॅग रीड होते. त्यात मोठा कालावधी वाया जातो. त्यामुळे प्रत्येक वाहनाला बराच वेळ लागतो. त्यावर उपाय शोधण्यात आला आहे. एनएचएआय आता दर्जेदार उपकरणं आणि सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून खरेदी करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून प्रमाणपत्र घेतल्याशिवाय ही उपकरणं खरेदी करण्यात येणार नाही.

हे सुद्धा वाचा

STQC प्रमाणपत्र आवश्यक

एनएचएआयची दुसरी कंपनी IHMCL नुसार आता RFID रीडर, अँटेना, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर, टोल लेन कंट्रोलर आणि टोल प्लाझा सर्व्हर खरेसाठी Standardization testing and Quality Certification ची आवश्यकता असेल. ही प्रमाणपत्र मिळालेली उपकरणं टोल नाक्यावर वापरण्यात येतील. त्यात काही गडबड झाल्यास अशा कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल.

ऑपोआप होईल फास्टॅग रिचार्ज

आरबीआयने 7 जून रोजी पतधोरण समितीची बैठक घेतली होती. त्यात ई-मॅडेंटसाठी नवीन फ्रेमवर्कची घोषणा केली होती. त्यामुळे फास्टॅग आणि नॅशनल मोबिलिटी कार्डसाठी ऑटोमॅटिक रिचार्जची सुविधा मिळेल. ऑटोमॅटिक रिचार्जसाठी ग्राहकांना आठवडी, मासिक आणि प्रत्येक दिवशीचा पर्याय मिळेल. ऑटोमॅटिक रिचार्जसाठी ग्राहकांना एक रक्कम निश्चित करावी लागेल. एक निश्चित राखीव रक्कम कमी झाल्यावर आपोआप फास्टॅग रिचार्ज होईल.

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.