केरळमध्ये NIA पुन्हा ॲक्शन मोडवर, PFI चा माजी सचिवाला अटक…

केरळमध्ये रौफ इतर पीएफआय पदाधिकारी, सदस्य आणि सहकाऱ्यांसह बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी कट रचल्याचे आढळले आहे.

केरळमध्ये NIA पुन्हा ॲक्शन मोडवर, PFI चा माजी सचिवाला अटक...
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 10:20 PM

नवी दिल्लीः केरळमध्ये एनआयएने बंदी घातलेल्या संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनआयएने केरळमधील पलक्कड येथून पीएफआयचे माजी राज्य सचिव सी. ए. रौफला अटक केली आहे. पीएफआयवर बंदी घातल्यापासून रौफ फरार होता. केंद्रीय तपास यंत्रणांकडून रौफला त्याच्या पलक्कड येथील पट्टांबी येथील घरातून अटक करण्यात आली आहे. केरळच्या पीएफआय प्रकरणातील रौफ हा तेरावा आरोपी आहे. एनआयएने सांगितले की, बंदी घातलेल्या पीएफआयचा रौफ हा राज्य सचिव होता आणि तो केरळमधील मीडिया आणि पीआर शाखा हाताळत होता. रौफ हा मुख्य सूत्रधारांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले आहे.

एनआयएने म्हटले आहे की केरळमध्ये रौफ इतर पीएफआय पदाधिकारी, सदस्य आणि सहकाऱ्यांसह बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी कट रचल्याचे आढळले आहे.

विविध धर्माच्या आणि गटांच्या सदस्यांमध्येही तेढ निर्माण करणे, जातीय सलोख्याला बाधा पोहोचवणारी कामे करणे आदी कामांमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता.

केंद्रीय एजन्सीने स्पष्ट करण्यात आले आहे की, ते गुन्हेगारी शक्तींना प्रोत्साहन देण्याचे काम करत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले होते.

रौफ असुरक्षित तरुणांना लष्कर-ए-तैयबा (एलईटी), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचाही त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

इसिस आणि अल कायदासारख्या दहशतवादी कारवाया करून भारतात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याचा त्यांचा डाव होता, त्यामुळे रौफला ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.