निलेश लंके यांनी करून दाखवलं… इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ; सुजय विखेंच्या आव्हानाला संसदेतून उत्तर
Nilesh Lanke took oath in English : निलेश लंके यांनी आज खासदारकीची शपथ घेतली आहे. निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेत सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश लंके यांनी इंग्रजीतून घेतलेल्या शपथेची अहमदनगर जिल्ह्यात जोरदार चर्चा होतेय. वाचा सविस्तर...
18 व्या लोकसभेच्या सदस्यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला. यात महाराष्ट्रासह देशभरातील खासदारांनी शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठीतून खासदारकीची शपथ घेणं पसंत केलं. मात्र अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीत लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. लोकसभेत इंग्रजीतून शपथ घेत निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांच्या आव्हानाला संसदेतून उत्तर दिलं आहे. निलेश लंके यांनी यांनी इंग्रजीतून घेतलेली शपथ, अहमदनगरसह राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.
सुजय विखे यांनी इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिल्यानंतर निलेश लंके यांनी संसेदत पहिल्यांदा बोलतानाच उत्तर दिलं आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी आज खासदारकीची शपथ घेतली आहे. निलेश लंके यांनी इंग्रजीत लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
सुजय विखे यांनी काय आव्हान दिलं होतं?
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा झाला होत. या मेळाव्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना आव्हान दिलं होतं. या मेळाव्यात सुजय विखे संसदेत इंग्रजीत भाषण करतानाचा एक व्हीडिओ दाखवण्यात आला होता. तेव्हा समोरच्या उमेदवाराने एक महिना पाठांतर करून तरी असं इंग्रजी बोलून दाखवलं तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं सुजय विखे म्हणाले होते. त्यांच्या याच आव्हानाला आता निलेश लंके यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे.
निलेश लंके यांची पोस्ट जशीच्या तशी
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून आज इंग्रजी भाषेत शपथ घेतली. हा क्षण अतिशय जबाबदारीचा आहे याची मला जाणिव आहे. माझ्या मतदारसंघातील जनतेप्रती असणारे कर्तव्य पुर्ण निष्ठा आणि समर्पण वृत्तीने पार पाडण्याचा हा संकल्प आहे. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे.
“Today, I took the oath in English as the Member of Parliament for the Nagar South Lok Sabha constituency. I am fully aware of the immense responsibility this moment carries. I am committed to fulfilling my duties towards the people of my constituency with complete dedication and pic.twitter.com/AgqVp97ASh
— Nilesh Lanke – निलेश लंके (@INilesh_Lanke) June 25, 2024
निलेश लंके हे आधी पारनेरचे आमदार होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आले आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. या लढतीची राज्यभर चर्चा झाली. सुजय विखे पाटील विरूद्ध निलेश लंके या लढतीत लंकेंचा विजय झाला. आज त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे.