नवी दिल्ली: नीति आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी पत्रकार परिषद घेतली. पॉल यांन भारतात आतातपर्यंत 18 कोटी लोकांना कोरोनाच्या लसी दिल्या गेल्या असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेमध्ये लसीकरण झालेल्या लोकांची संख्या 26 कोटी असून भारत तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतामध्ये ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये 216 कोटी कोरोना लसीचं उत्पादन केलं जाईल, अशी माहिती देखील पॉल यांनी दिली. रशियाद्वारे निर्मित स्पुतनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ती लस लोकांना दिली जाईल, अशी अपेक्षा असल्याची माहिती वी. के. पॉल यांनी दिली आहे.(Niti Aayog member V K Paul said Sputnik vaccine will be available in the market next week)
रशियाद्वारे निर्मित स्पुतनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ती लस लोकांना दिली जाईल, अशी अपेक्षा असल्याची माहिती वी. के. पॉल यांनी दिली आहे. जुलैमध्ये स्पुतनिक लसीचं उत्पादन भारतात होण्यास सुरुवात होईल, असंही ते म्हणाले.
#Sputnik vaccine has arrived in India. I’m happy to say that we’re hopeful that it’ll be available in the market next week. We’re hopeful that the sale of the limited supply that has come from there (Russia), will begin next week: Dr VK Paul, Member (Health), NITI Aayog#COVID19 pic.twitter.com/OGUTHvKCr9
— ANI (@ANI) May 13, 2021
भारतामध्ये ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये 216 कोटी लसींचं उत्पादन भारतीय नागरिकांसाठी केलं जाईल, अशी माहिती देखील वी के पॉल यांनी दिली. लवकरच सर्वांसाठी कोरोना लस उपलब्ध होईल, असंही वी.के.पॉल म्हणाले. जागतिक आरोग्य संघटना आणि अन्न व औषध प्रशासनानं परवानगी दिलेली लस भारतात आणता येईल. मात्र, यासाठी आवश्यक असणारा परवाना येत्या 1ते 2 दिवसामध्ये दिला जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
जैव तंत्रज्ञान विभाग, परराष्ट्र मंत्रालय आणि इतर विभाग हे फायजर, मॉडर्ना , जॉनसन अँड जॉनसन या कंपन्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी अधिकृतपणे भारतात कोरोना लसी पाठवणे किंवा उत्पादित करण्याविषयी कळवलं आहे. आम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचं ही पॉल म्हणाले. भारतातल्या कंपन्यांच्या सहकार्यानं लसनिर्मिती करण्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करतो, असंही वी.के.पॉल म्हणाले.
संबंधित बातम्या:
Vaccine Cocktail | दोन वेगवेगळ्या कोरोना लसींचे डोस घेतले तर? संशोधनाचा निष्कर्ष काय सांगतो?
Covaxin | 2 ते 18 वयोगटावर कोवॅक्सिनची चाचणी, DCGI कडून भारत बायोटेकला परवानगी
(Niti Aayog member V K Paul said Sputnik vaccine will be available in the market next week)