नितीन गडकरी सांगतात, खवय्येगिरी करण्यात कसलीच कमी सोडत नाही…
जेवणाच्या बाबतीत नितीन गडकरी प्रचंड खवय्येगिरी करणारे आहेत. म्हणून ते म्हणतात मी कमी जेवतो पण खाण्याबाबतीत कसलीही कमी सोडत नाही.
नवी दिल्लीः केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले की, ते मोठे खवय्ये आहे, म्हणजेच खाद्यप्रेमी म्हणून ते सायंकाळ झाली की त्यांच्या डोक्यात पहिला विचार येतो की आज आपण खायचे आहे. स्वाद कोणत्या पदार्थाचा घ्यायचा आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ते कोणताही पदार्थ खातील कमी पण खाण्याबाबतीत जराही कसूर सोडत नाही असंही त्यांनी सांगितले आहे.
नितीन गडकरी सांगतात की, मी जेवणाचा प्रचंड मोठा शौकीन आहे. त्यामुळे सायंकाळ झाली की, मी पहिल्यांदा विचार करतो की, आज कोणत्या हॉटेलमध्ये जायचे.
आणि काय खायचे आहे त्याचाही मी विचार करतो. जेवण आणि खाण्याबाबतीत ते म्हणतात की, काय खायचे कुठे खायचे यामध्ये मी काही कमी सोडत नाही. पण जेवणावर मात्र माझ्या मर्यादा आल्या आहेत असंही ते खुलेपणानं सांगतात.
नितीन गडकरी यांनी आपल्या जेवणाचा शौक सांगितला असला तरी लोकांना ते आपल्या आरोग्याची काळजीही घ्यायला सांगतात. जेवणाविषयी बोलताना त्यांनी टेस्लाचे संस्थापक एलन मस्कला भारतात की निर्मिती करायचे असेल तर आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो.
जर भारताऐवजी चीनमध्ये उत्पादन झाले तर त्यांना मार्केटिंगमध्ये सवलत मिळणार नाही. पण त्यांनी भारतातील कोणत्याही राज्यात उत्पादन केल्यास मात्र फायदा होईल असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.