राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही, नितीश कुमारांची कोलांट उडी

"मी निवृत्तीबद्दल बोललो नाही, प्रत्येक निवडणुकीच्या शेवटच्या रॅलीत मी हेच म्हणतो" असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं

राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही, नितीश कुमारांची कोलांट उडी
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 2:13 PM

पाटणा : ‘ही आपली अखेरची निवडणूक’ असं भावनिक आवाहन करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar Chief Minister Nitish Kumar) यांनी कोलांटउडी घेतली आहे. नजीकच्या काळात राजकीय संन्यास घेण्याचा आपला कोणताही इरादा नाही, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला, असं म्हणत नितीश यांनी यूटर्न घेतला. (Nitish Kumar Clarifies Recent Comment about retirement)

“मी निवृत्तीबद्दल बोललो नाही… मी प्रत्येक निवडणुकीच्या शेवटच्या रॅलीत नेहमी हेच म्हणतो.. अंत भला तो सब भला (शेवट गोड तर सारं गोड) तुम्ही माझं भाषण संपूर्ण ऐकलं, तर तुम्हाला संदर्भ लागेल आणि सर्व स्पष्ट होईल” असं नितीश कुमार यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितलं.

बिहारच्या पूर्णियामध्ये जेडीयू उमेदवाराचा प्रचार करताना नितीश कुमार यांनी भावनिक साद घातली होती “निवडणुकीचा आज अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणुका संपतील आणि ही माझी अखेरची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला” असं नितीश म्हणाले होते.

नितीश कुमार यांची राजकीय वाटचाल

नितीश कुमार हे आतापर्यंत सहा वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले असून यावेळी ते सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. नितीश कुमार यांनी 2004 मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांनी नालंदामधून विजय मिळवला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. 2005 मध्ये नितीश कुमार NDA ची सत्ता आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत बिहार विधान परिषदेचे सदस्यता स्वीकारली.

नितीश कुमार यांनी 1977 मध्ये आपली पहिली निवडणूक लढवली होती. त्यांनी नालंदाच्या हरनौत मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी 4 वेळा निवडणूक लढली. त्यात 1977 आणि 1980 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 1985 आणि 1995 च्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. (Nitish Kumar Clarifies Recent Comment about retirement)

नितीश कुमार यांनी 1972 मध्ये बिहार इंजीनिअर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही काळ बिहार स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डात नोकरीही केली होती. मात्र, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहियांसारख्या नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

संबंधित बातम्या :

‘ही माझी शेवटची निवडणूक!’, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून राजकीय संन्यासाची घोषणा

भाजपचे नित्यानंद राय मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत, नितीश कुमार केंद्रात जाणार?

(Nitish Kumar Clarifies Recent Comment about retirement)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.