Nitish Kumar LIVE News and Updates: नितीश कुमार यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नालंदा जिल्ह्यात NDA आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील शेवटच्या प्रचारसभेत नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेला भावनिक आवाहन केलं होतं. ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचं नितीश कुमार यांनी धमदाह इथे झालेल्या JDU उमेदवाराच्या प्रचासभेत सांगितलं होतं.

Nitish Kumar LIVE News and Updates: नितीश कुमार यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नालंदा जिल्ह्यात NDA आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 12:28 PM

पाटणा: “आज तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आता परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला”, अशा शब्दाक राजकीय संन्यासाचे संकेत देणाऱ्या नितीश कुमार यांचा शेवट गोड होणार? की तेजस्वी यादव यांच्या माध्यमातून बिहारला सर्वात तरुण मुख्यमंत्री मिळणार हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. अशावेळी बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (Tejaswi Yadav vs. Nitish Kumar, who will win in Bihar Assembly elections)

[svt-event title=”नितीश कुमार यांच्या बालेकिल्ल्यात NDA आणि महाआघाडीत चुरशीची लढत” date=”10/11/2020,12:27PM” class=”svt-cd-red” ] बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नालंदा जिल्ह्यात सध्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. नालंदा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. 7 पैकी 4 जागांवर NDAचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर 3 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीवर” date=”10/11/2020,10:31AM” class=”svt-cd-red” ] बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि RJD ची महाआघाडी सुरुवातीच्या कलानुसार आघाडीवर होती. पण आता हाती येत असलेल्या कलानुसार नितीश कुमार यांचा JDU आणि भाजपची महायुतीनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी नितीश कुमार यांचा JDU पक्ष तिसऱ्या क्रमांकावरच राहण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंतच्या कलानुसार RJDला 76, भाजपला 65, JDU ला 50 तर कांग्रेसला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. [/svt-event]

[svt-event title=”बिहार विधानसभा निवडणुकीत NDA ची शंभरी पार” date=”10/11/2020,9:13AM” class=”svt-cd-red” ] आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांच्या JDU आणि भाजपच्या महायुतीनं शंभरी पार केली आहे. NDAला आतापर्यंत 104 जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान या निवडणुकीत नितीश कुमार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नितीश यांचा JDU पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची शक्यता आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. तर तेजस्वी यादव यांच्या RJD ला बिहारच्या जनतेनं डोक्यावर घेतल्याचं आतापर्यंतच्या कलानुसार पाहायला मिळत आहे. [/svt-event]

[svt-event title=”नितीश कुमार यांचा JDU तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची शक्यता” date=”10/11/2020,8:57AM” class=”svt-cd-red” ] बिहार विधानसभा निवडणूक निकालात विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालाच्या कलानुसार विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड (JDU)तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर तेजस्वी यादव यांचा RJD पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्या JDU सोबत असलेला भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पोस्टल मतांमध्ये नितीश कुमार यांना झटका बसण्याची शक्यता” date=”10/11/2020,8:39AM” class=”svt-cd-red” ] बिहार निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या पोस्टल मंतांची मतमोजणी सुरु आहे. त्यामुळे JDUचे नितीशकुमार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोस्टल मतांमध्ये RJD आणि काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर JDU आणि भाजपच्या युतीला झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. [/svt-event]

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील शेवटच्या प्रचारसभेत नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेला भावनिक आवाहन केलं होतं. ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचं नितीश कुमार यांनी धमदाह इथे झालेल्या JDU उमेदवाराच्या प्रचासभेत सांगितलं होतं. ही आपली शेवटची निवडणूक आहे. शेवट गोड झाला तर सर्व काही चांगलं होतं, असं भावनिक वक्तव्य नितीश कुमार यांनी केलं होतं. नितीश कुमार यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून जोरदार टीकाही झाली होती.

तेजस्वी यादव सर्वात तरुण मुख्यमंत्री होणार?

RJDचे नेते तेजस्वी यादव यांना विजयाचा विश्वास आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये RJD आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीला बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या अदांजानुसार महाआघाडीची सत्ता आली तर तेजस्वी यादव बिहारचे आणि भारतातील एखाद्या राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत. तेजस्वी यादव यांनी नुकताच आपला 31 वा वाढदिवस साजरा केला.

बिहारचे सर्वात तरुण मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा सतिश प्रसाद सिंह यांच्या नावावर आहे. सतिश प्रसाद सिंह जानेवारी 1968 मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते. डॉ.जगन्नाथ मिश्रा एप्रिल 1975 मध्ये 38 व्या वर्षी बिहारचे मुख्यमंत्री झाले होते.

नितीश कुमार यांची राजकीय वाटचाल

नितीश कुमार हे ६ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. नितीश कुमार यांनी 2004 मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांनी नालंदामधून विजय मिळवला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. 2005 मध्ये नितीश कुमार NDAची सत्ता आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत बिहार विधान परिषदेचे सदस्यता स्वीकारली.

नितीश कुमार यांनी 1977 मध्ये आपली पहिली निवडणूक लढवली होती. त्यांनी नालंदाच्या हरनौत मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी 4 वेळा निवडणूक लढली. त्यात 1977 आणि 1980 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 1985 आणि 1995 च्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.

नितीश कुमार यांनी 1972 मध्ये बिहार इंजीनिअर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही काळ बिहार स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डात नोकरीही केली होती. मात्र, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहियांसारख्या नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 LIVE | बिहारमध्ये मतमोजणीला सुरुवात, पहिला कल भाजपला, 5 जागांवर आघाडीवर

Tejashwi Yadav: तेजस्वी यादव कोणत्या मतदारसंघातून लढतायत; कोण आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार?

Tejaswi Yadav vs. Nitish Kumar, who will win in Bihar Assembly elections

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.