रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचं कोणत्याच मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; कुणाकुणाला मिळालं निमंत्रण?

अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज अयोध्येत दाखल होत आहेत. अनेक मान्यवरांना निमंत्रण दिली गेली आहेत. काहींनी ही निमंत्रणे स्वीकारली आहेत. तर काहींनी नाकारली आहेत. या सोहळ्याचं वैशिष्ट्ये म्हणजे देशातील एकाही मुख्यमंत्र्याला या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही.

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचं कोणत्याच मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; कुणाकुणाला मिळालं निमंत्रण?
Pran Pratishtha ceremony of the Ram Temple Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 7:54 PM

अयोध्या | 21 जानेवारी 2023 : रामलल्ला प्रतिष्ठापनेचा उद्या दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. प्रभू श्री राम उद्या अयोध्येत विराजमान होणार असल्याने या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण अयोध्येत रोषणाई करण्यात आली आहे. देशविदेशातील पाहुणे या सोहळ्याला येणार आहेत. सर्व मान्यवरांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. मात्र, देशातील कोणत्याही मुख्यमंत्र्याला या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे कोणताच मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. फक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात साधूसंतांसह सिनेमा, क्रीडा, राजकारण आणि उद्योग जगतातील मान्यवरांचा समावेश आहे. रामजन्मभूमी ट्रस्टने हे निमंत्रण पाठवलं आहे. रामजन्मभूमी ट्रस्टने निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत राजकीय पक्षांची यादी मागवून या पक्षांच्या अध्यक्षांना निमंत्रण दिलं आहे. देशभरातील 8000 साधू-संतांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रातील 409 साधू संतांचाही यात समावेश आहे.

शिंदे आणि अजितदादांना निमंत्रण

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून निमंत्रण देण्यात आलेलं नाही. शिंदे यांना शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून निमंत्रण आले आहे, तर अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून. त्याच न्यायाने राष्ट्रवादीच्या दुसर्‍या गटाचे प्रमुख म्हणून शरद पवार, वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर इत्यादी नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. सरकारमधील फक्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोनच नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जेपी नड्डा यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

दिग्गजांना निमंत्रण

राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महंत नृत्य गोपाल दास, सरसंघचालक मोहन भागवत, बीएपीएस स्वामीनारायण संस्था, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अखिलेश यादव, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

कुणी निमंत्रण नाकारलं?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी, लालू प्रसाद यादव, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रण नाकारलं आहे.

या उद्योगपतींना निमंत्रण

गौतम अदानी, रतन टाटा, मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, एन. चंद्रसेखरन, अनिल अग्रवाल, एनआर नारायण मूर्ति

निमंत्रित खेळाडू

सचिन तेंडूलकर, विराट कोहली, एमएस धोनी, दीपिका कुमारी, रवींद्र जडेजा, सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे, वीरेंद्र सहवाग, नीरज चोपडा, मिताली राज, विश्वनाथन आनंद, सायना नेहवाल, लिएंडर पेस, पीव्ही सिंधू आणि पीटी उषा.

अभिनेते कोण येणार…

मोहनलाल, रजनीकांत, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, चिरंजीवी, संजय लीला भन्साळी, अक्षय कुमार, धनुष, रणदीप हुडा, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, कंगना रनौत, ऋषभ शेट्टी, मधुर भंडारकर, अजय देवगन, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, यश, प्रभास, आयुष्यमान खुराना, आलिया भट्ट आणि सनी देओल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.