दिल्लीत नवी ‘मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री’ सुरु करण्यावर बंदी, मुख्यमंत्री केजरीवालांचा मोठा निर्णय

वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत यापुढे कोणतीही नवी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सुरु करण्यास परवानगी मिळणार नाही.

दिल्लीत नवी 'मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री' सुरु करण्यावर बंदी, मुख्यमंत्री केजरीवालांचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 7:47 PM

नवी दिल्ली : वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत यापुढे कोणतीही नवी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सुरु करण्यास परवानगी मिळणार नाही. केजरीवाल यांनी अशा नव्या मॅन्युफॅक्टरिंग इंडस्ट्री सुरु करण्यावर बंदी घातली आहे. असं असलं तरी दिल्लीत नव्याने तयार होणाऱ्या औद्योगिक भागात केवळ कमी प्रदुषण करणाऱ्या सर्व्हिस इंडस्ट्री आणि हायटेक (hi-Tech) इंडस्ट्री सुरु करण्यास परवानगी असणार आहे (No manufacturing industry to be allowed in Delhi says Arvind Kejriwal).

यापुढील काळात दिल्लीमध्ये माहिती तंत्रज्ञान (IT), माध्यमं (Media), कॉल सेंटर, HR सर्व्हिस, BPO, TV व्हिडीओ प्रोडक्शन, वकील, CA, आर्किटेक्ट, मार्केट रिसर्च, प्लेसमेन्ट एजन्सी इत्यादी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी असेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (2 ऑक्टोबर) डिजीटल पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

‘दिल्लीतील औद्योगिक क्षेत्रांचा चेहरामोहराच बदलणार’

अरविंद केजरीवाल म्हणाले, “केंद्र सरकारने दिल्लीसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी दिल्ली सरकारने केंद्र सरकारला एक प्रस्ताव पाठवला होता. यामुळे दिल्लीतील औद्योगिक क्षेत्रांचा चेहरामोहराच बदलणार आहे. सध्या दिल्लीत अनेक बांधकाम आणि संबंधित उद्योग सुरु आहेत. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण वाढत आहे. मात्र, आता दिल्लीतील कोणत्याही नव्या औद्योगिक क्षेत्रात हायटेक आणि सर्व्हिस इंडस्ट्रीलाच परवानगी दिली जाईल.”

‘निर्मिती/बांधकाम उद्योगाऐवजी हायटेक किंवा सर्व्हिस इंडस्ट्री सुरु करा’

“याशिवाय जुन्या औद्योगिक क्षेत्रांमधील लोकांना देखील निर्मिती/बांधकाम उद्योगाऐवजी हायटेक किंवा सर्व्हिस इंडस्ट्री सुरु करण्याचं आवाहन केलं जाईल. सर्व्हिस इंडस्ट्री अंतर्गत चार्टर्ड अकाउंटन्ट, माध्यमाचे लोक, वकील आपली कार्यालयं सुरु करु शकतात. सॉफ्टवेअर इंडस्ट्री, आयटी सर्व्हिस इंडस्ट्री, आयटीयएस इंडस्ट्री, कॉल सेंटर, बँक ऑफिस प्रोसेसिंग, नॉलेज प्रोसेसिंग, अॅड एजन्सी असे अनेक उद्योग सुरु करता येतील,” असंही अरविंद केजरीवाल यांनी नमूद केलं.

‘सर्व्हिस इंडस्ट्रीला दिल्लीत स्वस्त दराने जागा उपलब्ध करुन देणार’

या निर्णयाचं समर्थन करताना केजरीवाल म्हणाले, “दिल्लीची अर्थव्यवस्था सर्व्हिस इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. आधी औद्योगिक क्षेत्रातील भाडं मॅन्युफॅक्टरिंग इंडस्ट्रीमुळे अधिक होतं. ते सर्व्हिस इंडस्ट्रीला महाग वाटायचं. त्यामुळे हे उद्योग गुरुग्राम, नोयडा अशा भागात गेले. मात्र, आता त्यांना दिल्लीत स्वस्त दराने औद्योगिक क्षेत्रात जागा उपलब्ध करुन दिली जाईल. त्यामुळे त्यांना इतर कोणत्याही शहरात जाण्याची गरज पडणार नाही.”

संबंधित बातम्या :

दिल्लीची हवाच नाही तर पाणीही दूषित, देशात मुंबईचं पाणी सर्वोत्तम

प्रदूषणावरील बैठकीला दांडी मारुन जिलेबीवर ताव, गंभीर ट्रोल

दिल्ली प्रदूषणावर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांचा स्तुत्य तोडगा

No manufacturing industry to be allowed in Delhi says Arvind Kejriwal

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.