Twin Tower Demolition videos : सायरन… स्फोट… धूळच धूळ… एक धमाका अन् 12 सेकंदांत ट्विन टॉवर जमीनदोस्त! देशातली पहिली मोठी कारवाई
500 मीटर परिसरात कोणालाही राहण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. दुपारी 2.15 वाजता एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आणि दुपारी 2.30 वाजता टॉवर पाडण्यात आले.

नोएडा : काऊंटडाऊन… 3 हजार 700 किलो स्फोटके… एक बटण… 12 सेकंदांत 31 आणि 29 मजली इमारत जमीनदोस्त… सगळीकडे धुरच धूर… हे चित्र होते आज नोएडातील दोन इमारती पाडल्यानंतरचे… नोएडाचे ट्विन टॉवर (Noida Supertech Twin Towers) अखेर कोसळले आहे. अवघ्या 12 सेकंदात टॉवर जमीनदोस्त करण्यात आले. संपूर्ण देशाचे या कारवाईकडे लक्ष लागून राहिलेले होते. सर्वच माध्यमांनी याचे थेट प्रक्षेपण केले. दुपारी अडीच वाजता स्फोटकांचा वापर (Use of explosives) करून या दोन अनधिकृत इमारती पाडण्यात आल्या. केवळ 12 सेकंदांत या दोन इमारती जमीनदोस्त झाल्या. यानंतर आजूबाजूला फक्त धुराचे लोट दिसत होते. नोएडा एक्स्प्रेस वेवर धूळ (Dust) साचली होती. तर ही कारवाई पाहण्यासाठी शेकडो लोक नोएडा एक्स्प्रेस वेवर जमले होते. दुपारी 2.30 वाजता टॉवर पाडण्यात आले.
अंदाजे 17.55 कोटी रुपये खर्च
500 मीटर परिसरात कोणालाही राहण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. दुपारी 2.15 वाजता एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आणि दुपारी 2.30 वाजता टॉवर पाडण्यात आले. सुमारे 100 मीटर उंच टॉवर खाली आणण्यासाठी 3,700 किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर करण्यात आला. सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी अंदाजे 17.55 कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा आहे. टॉवर पाडण्याचा हा खर्चही बिल्डर कंपनी सुपरटेक उचलणार आहे. या दोन टॉवरमध्ये एकूण 950 फ्लॅट बांधण्यात आले होते. ते बांधण्यासाठी सुपरटेक कंपनीने 200 ते 300 कोटी रुपये खर्च केले होते.



असे पाडले ट्विन टॉवर
धुळीचे साम्राज्य
नोएडाचे सीईओ म्हणाले, की नियोजन केल्याप्रमाणे टॉवर पाडण्यात आला. टॉवर पाडल्यानंतर जो राडारोडा आहे, तो रस्ता आणि एटीएसच्या भिंतीकडे गेला आहे. इमारत कोसळल्यानंतर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. सध्या सर्व ठीक आहे. संध्याकाळी 6.30नंतर जवळपासच्या सोसायटीत राहणाऱ्या लोकांना घरात प्रवेश दिला जाईल. परिसराची स्वच्छता केली जाईल. गॅस पुरवठा आणि वीज देखील पूर्ववत केली जाईल, असे ते म्हणाले.
— ANI (@ANI) August 28, 2022
ढिगारा बाजूला करण्यासाठी लागणार तीन महिने!
कुतुबमिनारपेक्षाही उंच असलेल्या दोन इमारती आज पाडल्या गेल्या. स्फोटापूर्वी सायरन वाजवण्यात आला. यानंतर हिरवे बटण दाबले गेले. मग डोळ्याची पापणी लवते न लवते त्या काही सेकंदातच भल्या मोठ्या या दोन इमारती ढिगाऱ्यात रुपांतरीत झाल्या. आता हा ढिगारा बाजूला करण्यासाठी आणि एकूणच परिसर पूर्ववत करण्यासाठी जवळपास तीन महिने लागणार आहेत.