Noida Supertech Twin Towers Demolition Live : ट्विन टॉवर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले; घटनास्थळी मोठा स्फोट

| Updated on: Aug 28, 2022 | 4:31 PM

Noida Supertech Twin Towers Demolition Live Updates आज नोएडामधील ट्विन टॉवर (Supertech Tower Demolition Live) पाडण्यात येणार आहे. हे टॉवर बेकायदेशीर असल्याने तब्बल 100 मीटर उचींची इमारत जमीनदोस्त होणार आहे.

Noida Supertech Twin Towers Demolition Live : ट्विन टॉवर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले; घटनास्थळी मोठा स्फोट

आज नोएडामधील ट्विन टॉवर (Supertech Tower Demolition Live) पाडण्यात येणार आहे. हे टॉवर बेकायदेशीर असल्याने तब्बल 100 मीटर उचींची इमारत आज जमीनदोस्त होणार आहे. वॉटर फॉल इम्प्लोशन तंत्राचा वापर करून 32 मजली एपेक्स टॉवर आणि 29 मजली सियान टॉवर आज जमीनदोस्त (Twin Towers Demolition Live Updates) होणार आहे. हे टॉवर पाडण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, वॉटर फॉल इम्प्लोशन तंत्राचा वापर करून या इमारती अवघ्या 12 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पाडल्या जातील. या तंत्रामुळे परिसरात असलेल्या इतर कुठल्याही इमारतीचे नुकसान होणार नाही. आज दुपारी अडीचच्या सुमारास हे दोन्ही टॉवर पाडले जाणार आहेत (Noida Tower Demolition Live) . दरम्यान ट्विन टॉवर पाडताना कोणीही खिडकीत, घराच्या छतावर अथवा गॅलरीत येऊन चित्रिकरण करू नये अशा खबरदारीच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Aug 2022 03:29 PM (IST)

    बोरिवली सोडावाला लेनच्या राजाचे जल्लोषात आगमन

    बोरिवली सोडावाला लेनच्या राजाचे जल्लोषात आगमन,

    मुंबईचा बोरिवली सोडावाळा लेनचा राजा गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विघ्नहर्ताचे भव्य स्वागत करण्यात आले.

    बाप्पाच्या आगमनापूर्वी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी गणपती बाप्पाचे नारळ फोडून स्वागत केले.

    गोपाळ शेट्टी म्हणाले की, दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा गणपती उत्सव उत्साहात आणि चैतन्याने साजरा होणार आहे, मी कार्यकर्त्यांना विनंती करू इच्छितो की, मोदी स्वच्छ भारत अभियानाबाबत बोलत असताना अशाप्रकारे कचरा टाकणे चांगले नाही,

    मी गणपती बाप्पाला विनंती करेन की आमच्या कार्यकर्त्यांना सुबुद्धी द्यावी.

    वरील संपूर्ण व्यवस्था विस्कळीत आहे, त्यामुळे खाली देखील बिघडलेली आहे, गणपती बाप्पा ही सर्व व्यवस्था दुरुस्त करण्याची बुद्धी देतील असा मला विश्वास आहे.

    सोडावाला लेनचा राजा 31 वर्षांचा झाला आहे, यावर्षी 25 फुटांच्या मूर्तीचे मोठ्या जल्लोषात, ढोलताशांच्या गजरात आगमन झाले आहे.

  • 28 Aug 2022 03:25 PM (IST)

    सोलापूरमधील चिकर्डे गावच्या दिव्यांग मुलीचे मृत्यू प्रकरण

    – सोलापूरमधील चिकर्डे गावच्या दिव्यांग मुलीचे मृत्यू प्रकरण

    – अतिरिक्त जिल्हाधिकारी चिकर्डे गावात दाखल

    – दिव्यांग निधीसाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान दिव्यांग मुलीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा दावा

    – ग्रामस्थांच्या तीन मागण्या आहेत त्यामध्ये मृत मुलीचा छोटा भाऊ आहे त्याचे पालकत्व घ्या, संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आणि मृत मुलीच्या कुटुंबीयांना आपत्कालीन मदतनिधी मिळावी अशा मागण्या आहेत

    – यातील दोन मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत मात्र गुन्हा दाखल करण्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पुढील कारवाई करुयात

    – मुलीचा मृत्यू उपोषणादरम्यान झाला की नाही याबाबत तपास करुन पुढील कारवाई होईल

  • 28 Aug 2022 02:41 PM (IST)

    ट्विन टॉवर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले

    ट्विन टॉवर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले

  • 28 Aug 2022 02:34 PM (IST)

    ट्विन टॉवर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले; घटनास्थळी मोठा स्फोट

  • 28 Aug 2022 02:27 PM (IST)

    नोएडा एक्स्प्रेस वे वरील वाहतूक थांबवली

    नोएडामधील ट्विन टॉवर जमीनदोस्त होण्यासाठी आता अवघे काही मिनिटेच बाकी आहेत. कोणत्याही क्षणीट्विन टॉवर कोसळू शकते. या दरम्यान कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून नोएडा एक्स्प्रेस वे वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच या परिसराला नो फ्लाय झोन घोषीत करण्यात आले आहे.

  • 28 Aug 2022 02:14 PM (IST)

    धोक्याचा पहिला सायरन वाजला, अवघ्या काही मिनिटांत कोसळणार ट्विन टॉवर

    धोक्याचा पहिला सायरन वाजला

    ट्विन टॉवर जमीनदोस्त होण्यास अवघे काही मिनिटे बाकी

    घटनास्थळी चोख बंदोबस्त

    दीड किलोमिटरपर्यंत सर्व रस्ते बंद

  • 28 Aug 2022 02:01 PM (IST)

    ट्विन टॉवरसमोरून लाईव्ह

    अग्निशमन दल पोलीस घटनास्थळी दाखल

  • 28 Aug 2022 01:41 PM (IST)

    2004 साली ट्विन टॉवरच्या बांधकामाला सुरुवात

    आज नोएडामधील 102 मीटर उंच ट्विन टॉवर जमीनदोस्त होणार आहे. 2004 साली या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती.सर्व नियम मोडीत काढून या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. असा आरोप सुरूवातीपासूनच करण्यात येत होता.

  • 28 Aug 2022 01:23 PM (IST)

    घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा , दीड किलोमीटर अंतरावरील सर्व रस्ते बंद

    घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 800 पेक्षा अधिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारत पाडताना कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी इमारतीकडे जाणारे सर्व रस्ते दीड किलोमीटर अंतरावर बंद करण्यात आले आहेत.

  • 28 Aug 2022 01:07 PM (IST)

    दहा वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आमचा विजय झाला – तेवतिया

    आज नोएडामधील ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. हे टॉवर पाडण्यात यावे या मागणीसाठी याचिकाकर्ते तेवतिया यांनी तब्बल दहा वर्ष लढा दिला अखेर त्यांचा विजय झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे की, हा आमचा विजय आहे. ही इमरात पाडण्याचे दीर्घकालीन फायदे आता अवघ्या तीन महिन्यांत दिसू लागलीत.

  • 28 Aug 2022 12:54 PM (IST)

    इमारत पाडल्यानंतर उडणाऱ्या धुराळ्यावर पाणी मारण्यासाठी दहा अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात

    आज नोएडामधील ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. हे टॉवर पाडल्यानंतर मोठ्याप्रमाणात धुराळा उडून प्रदूषण  होणार आहे. प्रदूषण वाढू नये यासाठी धुराळ्यावर पाण्याचा मारा करण्यासाठी दहा अग्निशमन दालाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या परिसरात कोणीही जाऊ नये अशा सूचना  देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.,

  • 28 Aug 2022 12:41 PM (IST)

    सिल्हवर सोसायटीमध्ये स्थलांतरीत नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था

    आज नोएडामधील बहूचर्चित ट्विन टॉवर  पाडण्यात येणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या इमरातीच्या परिसरात जेवढ्या सोसायटी आहेत, तेथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या नागिरांच्या वास्तव्याची तात्पुरती व्यवस्था सिल्हवर सोसायटीमध्ये  करण्यात आली आहे.

  • 28 Aug 2022 12:29 PM (IST)

    Noida Supertech Twin Towers Demolition Live : पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणार इमारत, काऊंटडाऊन सुरू

  • 28 Aug 2022 12:23 PM (IST)

    दुपारी 1 नंतर ट्विन टॉवरच्या दीड किलोमीटर परिसरात नागरिकांना मज्जाव

    ट्विन टॉवर पाडण्यासाठी आता अवघे दोन तास शिल्लक राहिले आहेत. यादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्या ती काळजी घेण्यात येत असून, दुपारी एकनंतर  ट्विन टॉवरकडे येणारे सर्व मार्ग दीड किलोमीटर अंतरावरच बंद केले जाणार आहेत.  त्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास धोक्याचा सायरन वाजवण्यात येणार आहे. आणि अडीच वाजता स्फोट घटवून आणला जाणार आहे.

  • 28 Aug 2022 12:08 PM (IST)

    Noida Supertech Twin Towers Demolition Live : दोन इमारतीमधील नागरिकांचा बाहेर पडण्यास नकार 

    आज नोएडामधील ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून या परिसरातील सर्व इमारतींमधून नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. मात्र दोन इमारतीमधील कुटुंबांनी बाहेर पडण्यास नकार दिला आहे. एनडीआरएफ टीमकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

  • 28 Aug 2022 11:55 AM (IST)

    Twin Towers Demolition Live : नोएडा एक्स्प्रेस वे काही वेळेसाठी बंद राहणार

    नोएडामधील सुपरटेक ट्विन टॉवर्स आज पाडण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. आज दुपारी अडीच वाजता हे टॉवर्स पाडण्या येणार आहेत. टॉवर पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्फोटकाचा वारप केला जाणार आहे. खबरदारी म्हणून काही काळ नोएडा एक्स्प्रेस वेही बंद ठेवण्यात येणार आहे.

  • 28 Aug 2022 11:46 AM (IST)

    Twin Towers Demolition Live : एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली

    आज ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. यादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. एनडीआरएफ टीमसोबतच  560 पोलीस आणि राखीव दलाचे 100 कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यता आले आहेत.

Published On - Aug 28,2022 11:35 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.