Twins Tower : गंगनचुंबी टॉवर पाडल्याने 711 लोकांचं स्वप्नभंग, 40 मजले बांधण्याची इच्छा होती
आज तो गंगनचुंबी टॉवर पाडण्यात आला, त्यावेळी तिथल्या परिसरात धुळीचं सामाज्य पाहायला मिळालं. तिथला प्रकल्प पाडत असताना अनेक ग्राहकांचं स्वप्नभंग झालं आहे.
नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून उत्तरप्रदेशातील (Uttarpradesh) नोएडा येथील दोन टॉवर (Tower) पाडणार असल्याची देशभर चर्चा होती. आज नोएडातील गगनचुंबी ट्विन टॉवर (Twins Tower) स्फोटाने जमीनदोस्त झाला आहे. तिथं राहायला जाणाऱ्या लोकांचं स्वप्नभंग झाला आहे. कारण तिथं टॉवर तयार झाल्यानंतर अधिक लोक राहायला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. जी बिल्डरने हा प्रकल्प सुरू करताना ग्राहकांना अधिक स्वप्न दाखवली होती. देशातील प्रसिद्ध बिल्डर सुपरटेकच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये या ट्विन टॉवरचा समावेश करण्यात आला होता. हा टॉवर बांधत असताना त्यामध्ये 3, 4 आणि 5 बीएचके फ्लॅट्स तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. विशेष म्हणजे दोन्ही टॉवर 40 मजले बांधण्याची बांधकाम व्यवसायिकाची इच्छा होती. काही लोकांनी तक्रारी केल्यानंतर प्रकरण वादग्रस्त ठरले. अनेक दिवस या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु होती. आज दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाल्यानंतर तिथं राहायला जाणाऱ्या लोकांचं स्वप्नभंग झालं एवढ मात्र नक्की.
711 ग्राहकांनी घरे बुक केल्याची माहिती
या प्रकल्प तयार करीत असताना बांधकाम व्यवसायिकाने अधिक प्रचार केला होता. त्याचबरोबर हा प्रकल्प 2006 साली जाहीर केला होता. नोएडातील हा सगळ्यात अधिक अलिशान प्रकल्प होता. ज्यावेळी हा प्रकल्पाचं लॉंचिंग केला गेला. त्यावेळी त्यांनी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी स्वप्न दाखवली होती. त्यामुळे हा गृहप्रकल्प तयार होण्याच्या आगोदर 711 ग्राहकांनी घरे बुक केल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी अधिक ग्राहकांनी आपली पुर्ण रक्कम बांधकाम व्यवसायिकाला दिली होती. त्यामुळे अधिक लोकांनी तिथं घरे खरेदी केली होती.
परिसरात धुळीचं सामाज्य
आज तो गंगनचुंबी टॉवर पाडण्यात आला, त्यावेळी तिथल्या परिसरात धुळीचं सामाज्य पाहायला मिळालं. तिथला प्रकल्प पाडत असताना अनेक ग्राहकांचं स्वप्नभंग झालं आहे.