नवा महिना महागाईचा, इंधनानंतर विनाअनुदानित गॅस सिलेंडरचीही दरवाढ

सर्वसामान्य नागरिकांना विनाअनुदानित गॅससाठी 11.50 अधिक मोजावे लागतील, तर 19 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत तब्बल 110 रुपयांनी वाढली आहे. (Non Subsidized gas rate hike)

नवा महिना महागाईचा, इंधनानंतर विनाअनुदानित गॅस सिलेंडरचीही दरवाढ
Follow us
| Updated on: Jun 01, 2020 | 1:11 PM

पुणे : जनतेला नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी दरवाढीचा सामना करावा लागत आहे. राज्यात इंधनाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची दरवाढ झाली असतानाच देशात घरगुती गॅसचीही भाववाढ झाली आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात साडेअकरा रुपये दरवाढ करण्यात आली आहे. (Non Subsidized gas rate hike)

14.2 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची वाढीव दराने विक्री होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना विनाअनुदानित गॅससाठी 11.50 अधिक मोजावे लागतील, तर 19 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत तब्बल 110 रुपयांनी वाढली आहे.

कोरोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या नागरिकांच्या खिशाला भुर्दंड बसला आहे. आधीच पेट्रोल-डिझेलचे दर प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढले होते. त्यात गॅसची किंमतही वाढल्याने नागरिकांच्या आर्थिक संकटात वाढ झाली.

हेही वाचा : वाहनचालकांच्या खिशाला कात्री, एक जूनपासून पेट्रोल डिझेल महाग

पुण्यात पूर्वी विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर 582 रुपये होता, आता तो 593.50 वर पोहचला आहे. अहमदनगरला 593 वरुन 604.50 रुपयांवर गेला. तर 19 किलो ग्रॅमचा सिलेंडर 1055 वरुन 1165 रुपयांवर गेला आहे‌. प्रत्येक शहरातील स्थानिक कर पद्धती आणि वाहतूक यानुसार सिलेंडरची किंमत काही फरकाने कमी-अधिक असू शकते.

पेट्रोल-डिझेलही महागले

मुंबईत पेट्रोलचे दर 76.31 रुपयांवरुन 78.31 रुपयांवर गेले आहेत. तर मुंबईतील डिझेल प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढून 68.21 रुपयांवर गेले आहे. देशभरात लॉकडाऊन झाल्याने कमी झालेला महसूल भरुन काढण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.

पेट्रोलवरील 26% आणि डिझेलवरील 24% ‘व्हॅट’शिवाय राज्य सरकार इंधनांवर उपकर (सेस) आकारते. सरकारने पेट्रोलवरील उपकर 8.12 रुपयांवरुन 10.12 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढवण्याची अधिसूचना जारी केली. तर डिझेलवरील उपकर प्रतिलिटर एक रुपयाऐवजी तीन रुपयापर्यंत वाढवला आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत पेट्रोल डिझेल विक्री मोठ्या प्रमाणात घटल्याने महसूल आटला होता. आता इंधनदर वाढल्याने तिजोरीत महसूल काही प्रमाणात वाढण्याची आशा आहे

(Non Subsidized gas rate hike)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.