Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई ते पुणे, नाशिक तर रत्नागिरी आणि धुळ्यापर्यंतचा नॉनस्टॉप प्रवास शक्य, नवी 500 km रेंजची इलेक्ट्रीक बस दाखल

पारंपारिक डिझेल बसेसना इलेक्ट्रिक बसेसचा पर्याय दिल्यास जिवाश्म इंधनावरचा ( डिझेल ) भारताचा खर्च वाचणार आहे. भारताची इंधनाची आयात कमी झाल्याने परकिय चलन वाचू शकते. बरोबरीनेच ऑपरेशनल खर्च कमी आणि शहरातील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली जाऊ शकते. इलेक्ट्रिक टिपर्सच्या क्षेत्रातही कंपनीने आपले पाय रोवल्याचे म्हटले आहे.

मुंबई ते पुणे, नाशिक तर रत्नागिरी आणि धुळ्यापर्यंतचा नॉनस्टॉप प्रवास शक्य, नवी 500 km रेंजची इलेक्ट्रीक बस दाखल
Follow us
| Updated on: Jan 19, 2025 | 6:16 PM

राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पो’ मध्ये नव्या मोटारी आणि प्रवासी वाहनांची नवीन मॉर्डल प्रदर्शित झाली आहेत . ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमीटेड (OGL) कंपनीने आपली नव्या पिढीच्या ‘इलेक्ट्रिक बस’ या मेळ्यात लाँच केल्या आहेत. एकदा चार्ज केल्यावर या बसेस थोडेथोडके नव्हे चक्क 500 किलोमीटर्स धावणार आहेत. म्हणजेच मुंबईतून केवळ पुणेच नव्हेच तर नाशिक, थेट छत्रपती संभाजीनगर , अहिल्यादेवी नगर , कोकणाती थेट सांवतवाडीपर्यंत ही बस एका चार्जिंगमध्ये प्रवास करु शकणार आहे.

ओलेक्ट्राने नव्याने डिझाईन केलेल्या १२-मीटर ब्लेड बॅटरी प्लॅटफॉर्म आणि नवीन शैलीतील ९ – मीटर सिटी आणि ब्लेड बॅटरीने सुसज्ज अशी १२-मीटर कोच बसेस अशी नवी उत्पादने दिल्लीतील प्रदर्शनात सादर केली आहेत. महाराष्ट्रासाठी याचे महत्व अशासाठी की ऑलेक्ट्राला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. इ- शिवाई आणि शिवनेरी बरोबरच ९ मीटरच्या छोट्या बसेस देखील टप्प्या टप्याने एसटी महामंडळाला दर महिन्याला टप्प्या टप्प्याने ऑलेक्ट्राकडून पुरविला जात आहे.

ब्लेड बॅटरी तंत्रज्ञान

ब्लेड बॅटरीमध्ये 30 % अधिक ऊर्जा साठवणूक क्षमता आहे, ज्यामुळे या बसेस एका चार्जिंगवर 500 किलोमीटरपर्यंतचा प्रवास बिनदिक्कतपणे करू शकतात. ही बस अधिक जागा वाचवते आणि तुलनेने हलकी आहे. 5000 पेक्षा जास्त चार्ज सायकलचे आयुष्य असणारी ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी आगामी काळात जास्त टिकाऊ आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकते. कंपनीने दावा केल्या प्रमाणे आंतराष्ट्रीय मानकांच्या अत्यंत कठोर चाचण्या कोणत्याही आग स्फोटासारखे अपघात न होता या बॅटरीजने पार केलेल्या आहेत.अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स (ADAS), GPS ट्रॅकिंग आणि CCTV कॅमेरे यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे उत्तम सुरक्षा उपाययोजना या बसेसमध्ये आहेत. एअर सस्पेंशन, व्हीलचेअर रॅम्प सारख्या सुविधा यामूळे या बसेस दिव्यांगस्नेही देखील आहेत .

हे सुद्धा वाचा
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.