भारताच्याच नव्हे तर पोलंडच्या संसदेतही निघाला धूर, काय घडली घटना?
पोलिश राजकारणी डोनाल्ड टस्क यांची पंतप्रधानपदी वर्णी लागली. त्यांचा विश्वासदर्शक ठरावावर संसदेत चर्चा होणार होती. परंतु, सदस्य ग्र्जेगॉर्ज ब्रॉन यांच्या या कृतीमुळे हा ठराव संसदेत येऊ शकला नाही. ग्रेगॉर्ज ब्रॉन यांच्या या कृत्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पोलंड | 13 डिसेंबर 2023 : भारताच्या संसदेमध्ये दोन तरुणांनी प्रवेश करून धुराच्या नळकांड्या घेऊन गोंधळ घातला. त्या सदृश्य एक घटना पोलंडच्या संसदेतही घडली आहे. पोलंडच्या एका खासदारानेच संसदेमध्ये गोंधळ माजविला. त्या खासदाराला त्याच्या या कृत्याची शिक्षा म्हणून संसदेच्या कामकाजात एका दिवसासाठी सहभागी होण्यापासून रोखण्यात आले आहे. त्याच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. संसदेचे अध्यक्ष सिमोन हॉलौनिया यांनी त्या खासदाराच्या कृतीला निषेधार्ह म्हटले आहे.
पोलंडच्या संसदेमध्ये ज्यूंचा हनुक्का हा सण साजरा होत होता. त्यासाठी तेथे मेणबत्त्या पेटविण्यात आल्या होत्या. यावेळी कॉन्फेडरेशन पार्टीचे सदस्य ग्र्जेगॉर्ज ब्रॉन यांनी या सणाला सैतानी म्हणत संसदेतील सर्व मेणबत्त्या विझवल्या. त्यामुळे संसदेत धुराचे लोट पसरले. अचानक धुराचे लोट पसरल्याने संसदेत गोंधळ उडाला.
सोमवारीच पोलिश राजकारणी डोनाल्ड टस्क यांची पंतप्रधानपदी वर्णी लागली. त्यांचा विश्वासदर्शक ठरावावर संसदेत चर्चा होणार होती. परंतु, सदस्य ग्र्जेगॉर्ज ब्रॉन यांच्या या कृतीमुळे हा ठराव संसदेत येऊ शकला नाही. ग्रेगॉर्ज ब्रॉन यांच्या या कृत्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
ग्रेगॉर्ज ब्रॉन 2019 मध्येच खासदार झाले आहेत. त्यांच्या कॉन्फेडरेशन पार्टी या पक्षाने पोलिश संसदेत हनुक्का मेणबत्त्या विझवणार्या खासदार ग्रेगोर्झ ब्रॉन यांच्या कृतीचा निषेध केला आहे. पोलंडच्या कॅथलिक चर्चचे कार्डिनल आणि ज्यूंशी वाटाघाटी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष रिस यांनी या कृतीबद्दल मी पोलंडमधील संपूर्ण ज्यू समुदायाची माफी मागितली आहे.
उजव्या विचारसरणीचा राजकारणी
पोलंडच्या उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांमध्ये ग्रझेगोर्झ ब्रॉन यांची गणना केली जाते. अलीकडे त्यांनी होलोकॉस्टमध्ये वाचलेल्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. ज्यांची मालमत्ता नष्ट झाली किंवा लुटली गेली त्यांना ही भरपाई देण्यात आली होती.
सेमेटिझमविरुद्ध लढले पाहिजे
पोलंडमधील अमेरिकेचे राजदूत मार्क ब्रेन्झिस्की यांनी सोशल मीडियावर ग्रेगॉर्ज ब्रॉन यांच्या कृतीचे वर्णन अपमानास्पद असे केले आहे. ही कृती प्रत्येकाला आपण सतर्क राहण्याची गरज का आहे याची आठवण करून देते असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान पोलंडचे प्रमुख रब्बी मायकल यांनी ब्रॉनने विझवलेल्या मेणबत्त्या पुन्हा पेटविण्यात आल्या आहेत अशी माहिती दिली.