एका महिन्यात सरकारी बंगला रिकामा करा, प्रियंका गांधींना केंद्र सरकारची नोटीस
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांना 1 महिन्याच्या आत आपला सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Notice to Priyanka Gandhi Vadra)
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांना 1 महिन्याच्या आत आपला सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Notice to Priyanka Gandhi Vadra). याबाबत केंद्र सरकारने त्यांना नोटीस पाठवली आहे. प्रियंका गांधी यांना लोधी रोड येथील सरकारी बंगला क्रमांक 35 देण्यात आला होता. मात्र, नव्याने देण्यात आलेल्या नोटीसप्रमाणे त्यांना आपलं हे सरकारी घर 1 महिन्याच्या आत रिकामं करावं लागेल.
प्रियंका गांधी यांना यापूर्वी विशेष सुरक्षा (SPG) देण्यात आली होती. त्यामुळेच त्यांना सरकारी बंगल्याचीही सुविधा मिळाली होती. मात्र, केंद्र सरकारने त्यांची विशेष सुरक्षा व्यवस्था काढली आहे. त्यामुळे त्यांना हा बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रियंका गांधी यांना लवकरच हा बंगला रिकामा करुन आपल्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल. त्यांच्यावर या सरकारी बंगल्याच्या भाड्यापोटी 3 लाख 46 हजार रुपये देणेदारी बाकी आहे.
मागील वर्षी प्रियंका गांधी यांची विशेष सुरक्षा काढून त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती. नियमांनुसार सुरक्षा व्यवस्था पुरवताना विशेष सुरक्षा पुरवली जाईल त्याला सरकारी बंगल्याची तरतूद आहे. मात्र, झेड सुरक्षा व्यवस्थेत सरकारी निवासस्थानाची तरतूद नाही. याचाच आधार घेऊन प्रियंका गांधी यांना ही नोटीस देण्यात आली आहे.
सरकारी आदेशानुसार प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्ट 2020 पूर्वी हा सरकारी बंगला सोडावा लागेल. त्यांना देण्यात आलेल्या अधिकृत नोटीसमध्ये त्यांनी निश्चित वेळेत बंगला रिकामा न केल्यास त्यांना आर्थिक दंडही होऊ शकतो.
भाजपा व मोदी सरकार की कांग्रेस नेत्रत्व से अंधी नफ़रत तथा प्रतिशोध की भावना जग ज़ाहिर है।
अब तो वह और औछी हरकतों व हथकंडों पर उतर आए हैं। प्रियंका जी का मकान ख़ाली कराने का नोटिस मोदीजी-योगीजी की बेचैनी दिखाता है।
कुंठित सरकार के तुग़लकी फ़ैसलों से हम डरने वाले नहीं। pic.twitter.com/X9omFdPvLu
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) July 1, 2020
केंद्र सरकारच्या या नोटीसनंतर काँग्रेसने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक ट्विट करत त्यात केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. ते म्हणाले, “भाजप आणि मोदी सरकारचा काँग्रेसच्या नेत्यांबद्दल आंधळा द्वेष आणि बदल्याची भावना जगजाहीर आहे. आता तर त्यांनी आणखी खालच्या स्तरावरील मार्ग निवडला आहे. प्रियंका गांधी यांना घर रिकामं करण्याच्या नोटीसवरुन मोदीजी आणि योगीजी यांची अस्वस्थता समजून घेता येऊ शकते.
हेही वाचा :
नितीन गडकरींचा चीनला दणका, महामार्गांची कामं चिनी कंपन्यांना नाही
रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार, लवकरच मोदी सरकारची मोठी योजना
लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना
Priyanka Gandhi Vadra vacate Government house