Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tomato Price : घरबसल्या खरेदी करा टोमॅटो! किंमत पण एकदम स्वस्त

Tomato Price : टोमॅटोच्या महागाईवर उतारा शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणजे तुम्हाला घरबसल्या टोमॅटो खरेदी करता येतील. तेही अगदी किफायतशीर किंमतीत..

Tomato Price : घरबसल्या खरेदी करा टोमॅटो! किंमत पण एकदम स्वस्त
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 8:48 AM

नवी दिल्ली | 23 जुलै 2023 : टोमॅटोच्या वाढत्या किंमतींनी (Tomato Price Hike) सर्वच जण हैराण झाले आहेत. सर्वसामान्यांपासून बॉलिवूड स्टारपर्यंत सर्वांनीच नाराजी व्यक्त केली आहे. टोमॅटोच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्राने नाफेडसोबत हातमिळवणी केली आहे. आता घरबसल्या नागरिकांना स्वस्तात टोमॅटो ऑनलाईन खरेदी करता येईल. सरकारच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, ओएनडीसीने (ONDC) ही सेवा सुरु केली आहे. काही शहरात ही सेवा सुरु करण्यात आली आहे. अगदी किफायतशीर किंमतीत सामान्य नागरिकांना टोमॅटोची खरेदी करता येईल. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर (Online Platform) बुकिंग केल्यावर त्याला घरपोच टोमॅटो मिळतील.

किंमती भडकल्या

दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या किंमती 25-30 रुपये किलो होत्या. आता या किंमती 150 ते 250 रुपये प्रति किलो आहे. तर काही ठिकाणी हा भाव 220-300 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. व्यापारी, दलाल हे जास्त नफा कमावत आहे. तर शेतकऱ्यांना पण यंदा चांगला भाव मिळाला आहे. पावसाने ओढ दिल्यास दक्षिण राज्यात सुद्धा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

स्वस्तात टोमॅटो

एका महिन्यातच टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या. त्यानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप केला. 14 जुलै रोजी किफायतशीर दरांमध्ये देशभरातील विविध ठिकाणी टोमॅटो विक्री सुरु केली. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून टोमॅटो विक्री सुरु करण्यात आली.

दोन एजन्सीवर जबाबदारी

केंद्र सरकारने त्यासाठी दोन मार्केटिंग एजन्सीवर जबाबदारी सोपवली. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ लिमिटेड (NAFED) आणि भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ लिमिटेड (NCCF) या दोन संस्थावर ही जबाबदारी आहे.

अशी आहे किंमत

ONDC प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना किफायतशीर किंमतीत टोमॅटोची खरेदी करता येईल. NCCF च्या मदतीने ही सोय करण्यात आली आहे. पुढील 10-15 दिवस या माध्यमातून टोमॅटोची विक्री करण्यात येईल. 70 रुपये किलोने टोमॅटोची विक्री करण्यात येत आहे.

खरेदी करा पण मर्यादीत

सर्वच ग्राहकांना टोमॅटो मिळावेत यासाठी खरेदीवर मर्यादा घालण्यात आली आहे. एका ग्राहकाला जास्तीत जास्त 2 किलो टोमॅटो खरेदी करता येईल. ओएनडीसीवर ही ऑर्डर बुक करता येईल. ओएनडीसीचे व्यवस्थापकीय संचालक टी. कोशी यांनी ही माहिती दिली.

दिल्लीत ऑनलाईन विक्री

22 जुलैपासून दिल्लीत 70 रुपये दराने टोमॅटोची ऑनलाईन विक्री सुरु करण्यात आली आहे. सध्या एका ग्राहकाला जास्तीत जास्त 2 किलो टोमॅटो खरेदी करता येईल.

काय आहे ONDC

ओएनडीसी, अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनाक्कर देत आहे. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजे ओएनडीसीची सुरुवात सप्टेंबर 2022 मध्ये करण्यात आली होती. हा एक सरकारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. अनेक वस्तू या प्लॅटफॉर्मवर स्वस्तात मिळतात. अद्याप ओएनडीसीचा कोणतेही एप नाही. Paytm, MagicPin वा Pincode अशा एपवर ओएनडीसी सर्च करता येते.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.