Chardham Yatra : नोंदणीशिवाय नाही करता येणार चारधाम यात्रा, सर्वात अगोदर करावे लागले हे काम

Chardham Yatra : हिंदू धर्मात चार धाम यात्रा ही अत्यंत पवित्र मानण्यात येते. आता या यात्रेसाठी सरकारने काही नियम तयार केले आहेत. केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीच्या दर्शनासाठी भाविक, श्रद्धाळू कित्येक महिन्यांपासून वाट पाहतात. आता धार्मिक स्थळी जाण्यासाठी नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे.

Chardham Yatra : नोंदणीशिवाय नाही करता येणार चारधाम यात्रा, सर्वात अगोदर करावे लागले हे काम
चार धाम यात्रा
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 8:06 PM

नवी दिल्ली : हिंदू धर्मात चार धाम यात्रा (Chardham Yatra) ही अत्यंत पवित्र मानण्यात येते. आता या यात्रेसाठी सरकारने काही नियम तयार केले आहेत. केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीच्या दर्शनासाठी भाविक, श्रद्धाळू कित्येक महिन्यांपासून वाट पाहतात. ही सर्व धार्मिक स्थळ उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात येतात. जर तुम्हाला या पवित्र स्थळी दर्शनासाठी जायचे असेल तर अगोदर नाव नोंदणी (Registration) करावी लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला या धार्मिक यात्रेत सहभागी होता येणार नाही. दर वर्षी चारधाम यात्रा एप्रिल ते मे महिन्यात सुरु होते आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत सुरु असते. या वर्षापासून राज्य सरकारने चारधाम यात्रेसाठी नोंदणी सुरु केली आहे.

उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी धार्मिक यात्रेकरुंना रजिस्ट्रेशन अनिवार्य केले आहे. चार धाम यात्रेसाठी भाविकांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येते. सध्याच्या स्थितीत बद्रीनाथ आणि केदारनाथ या धार्मिक शहरांसाठी नोंदणी सुरु आहे. तर गंगोत्री आणि यमुनोत्री या धामासाठी नोंदणी अजून सुरु झालेली नाही. दोन्ही मंदिरांचे दरवाजे उघडण्याची घोषणा झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखालील समिती चारधाम यात्रेच्या तयारीचा आढावा घेणार आहे. त्यादरम्यान अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्या जाऊ शकतात. गेल्या वर्षी चारधाम यात्रेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची शक्यता आहे. राज्याच्या पर्यटन विभागाने गेल्या वर्षीच्या आधारावर यंदा केदारनाथ धामसाठी प्रति दिवशी 15 हजार, बदरीनाथ धामसाठी प्रति दिवशी 18 हजार, गंगोत्री धामसाठी 9000, यमुनोत्रीसाठी 6000 भाविकांना दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

चारधाम यात्रेच्या मार्गावर भाविकांना आरोग्य सुविधा, केदारनाथ धामसाठी राहण्याची व्यवस्था, बद्रीनाथ आणि केदारनाथ धामसाठी व्हीआयपी दर्शनासाठी शुल्क निश्चिती, बसची सुविधा, घोडे आणि खेचरांची आरोग्य तपासणी, पायी जाणाऱ्या भाविकांसाठी गरम पाण्याची व्यवस्था, शेड, वीज आणि पिण्याचे पाणी, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती आदी व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी करा नोंदणी

  1. registrationandtouristcare.uk.gov.in या संकेतस्थळावर जा
  2. रजिस्ट्रेशन/लॉगिन फॉर्मवर क्लिक करा
  3. चारधाम यात्रेसाठी वैयक्तिक तपशील नोंदवा
  4. चारधाम ऑनलाईन नोंदणी प्रणाली द्वारे मोबाईल आणि ईमेल माध्यमातून ओटीपी सत्यापित करा
  5. तुमच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे आणि पॉसवर्ड आधारे लॉगिन करावे लागेल
  6. याठिकाणी डॅशबोर्ड दिसेल. त्यावर तीर्थयात्रेकरुने क्लिक केल्यास दुसरी विंडो उघडेल
  7. तुमच्या प्रवासाचा रुट निश्चित करण्यापूर्वी त्यासंबंधीची माहिती, तपशील तुम्हाला द्यावा लागेल
  8. या तपशीलात टूरचा प्रकार, टूरचे नाव, यात्रेला जाण्याची तारीख, यात्रेकरुंची संख्या आदी माहिती भरावी लागेल
  9. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक एसएमएसद्वारे प्राप्त होईल
  10. त्यानंतर तुम्हाला चारधाम यात्रेचे नोंदणी पत्र डाऊनलोड करता येईल
  11. चारधाम यात्रेत सहभागी होण्यासाठी 8394833833 या व्हॉट्सअप क्रमांकावर अर्ज करता येईल
  12. टोल फ्री क्रमांक 1364 द्वारे तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल
  13. या नोंदणीसाठी यात्रेकरुंचे आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो लागेल
  14. मोबाईल क्रमांक योग्य हवा, ज्याचे नावे रजिस्ट्रेशन करत आहात, त्यांचाच मोबाईल क्रमांक हवा. नाहीतर तुम्हाला यात्रा करता येणार नाही

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.