Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी भाजी विकतंय तर कुणी झालाय 14000 कोटींचा मालक, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची ऐका ही कहाणी

देशात सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन लोक आयएएस अधिकारी बनतात. काही कलेक्टर तर काही कमिशनर होतात. पगारासह घर, गाडीसह सर्व सुविधा त्यांना मिळतात. पण, असे काही जण आहेत की...

कुणी भाजी विकतंय तर कुणी झालाय 14000 कोटींचा मालक, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची ऐका ही कहाणी
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 7:55 PM

नवी दिल्ली : सरकारी नोकरी कोणाला आवडत नाही? कार्यालयाच्या निश्चित वेळा, भरभक्कम पगार, सुरक्षित नोकरी, वेळोवेळी लागू होणारा वेतन आयोग, आणि मुख्य म्हणजे निवृत्तीनंतर पेन्शन. या साऱ्या बाबींमुळे लोक सरकारी नोकरी मिळावी यासाठी तडफडत असतात. त्यात ही नोकरी जर आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याची असेल तर? देशात सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन लोक आयएएस अधिकारी बनतात. काही कलेक्टर तर काही कमिशनर होतात. पगारासह घर, गाडीसह सर्व सुविधा त्यांना मिळतात. पण, असे काही जण आहेत की आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी या सरकारी नोकरीवर पाणी सोडले. नोकरी सोडल्यानंतर त्यांना अनेक आव्हानांना सामोरे लावे लागले. पण, त्यावर मात करून ते आता यशस्वी व्यावसायिक बनले आहे.

एमबीबीएस, आयएएस आणि आता 14000 कोटींचा मालक रोमन सैनी

वयाच्या 16 व्या वर्षी रोमन सैनी एम्सची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर एमबीबीएस पदवी पूर्ण करून डॉक्टर झाले. NDDTC साठी कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत राजीनामा देत UPSC ची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात UPSC पास झाले आणि आयएएस अधिकारी बनले. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आयएएस परीक्षेत पास होऊन संपूर्ण देशात 18 वा क्रमांक पटकावला. दोन वर्षांनी त्यांनी येथूनही राजीनामा दिला.

हे सुद्धा वाचा

सरकारी नोकरी सोडून त्यांनी Unacademy ही एज्युटेक कंपनी सुरू केली. Unacademy चे मुख्यालय बंगलोर येथे आहे. सध्या Unacademy चे मूल्यांकन 14000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. Unacademy मध्ये IAS सह 35 वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते.

आयएएस ‘सब्जीवाला’

मध्यप्रदेश केडरचे प्रवेश शर्मा हे 1982 च्या बॅचचे आयएएस अधिकारी. 34 वर्षे त्यांनी IAS अधिकारी म्हणून काम केले. 2016 मध्ये सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरू केला.

‘सब्जीवाला’ नावाचा स्टार्टअप सुरू करून त्यांनी या व्यवसायात प्रगती केली. त्यांच्या स्टार्टअपद्वारे फळे आणि भाजीपाला विकतात. ताज्या आणि आरोग्यदायी गोष्टी प्रत्येकाला उपलब्ध करून देणे हे प्रवेश वर्मा यांचे ध्येय आहे. सब्जीवाला या वेबसाइटमुळे शेतकरी थेट ग्राहकांशी जोडला गेला. याचाच शेतकऱ्यांना बराच फायदा होत आहे. तर, ग्राहकांनाही ताजी फळे आणि भाजीपाला घरपोच मिळत आहे.

नाममात्र शुल्कात अंतराळ अभ्यास

जी व्ही राव हे निवृत्त आयएएस अधिकारी. 2014 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नोकरीनंतर विश्रांतीऐवजी त्यांनी लर्निंग स्पेस एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली. अगदी नाममात्र शुल्क आकारून मुलांना अंतराळ शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते.

वडील गेले, सरकारी नोकरी सोडली, औषधे विकली

2000 च्या बॅचचे डॉ. सय्यद सबाहत अझीम हे आयएएस अधिकारी. योग्य उपचार न मिळाल्याने त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सरकारी नोकरी सोडून व्यवसायाच्या जगात येण्याचा निर्णय घेतला. आरोग्यसेवा क्षेत्रात त्यांनी स्वत:चे ग्लोकल हेल्थकेअर सिस्टम्स नावाचे स्टार्टअप सुरू केले. आज त्यांच्या या व्यवसायाची उलाढाल काही कोटींमध्ये आहे.

अदानी समूहाचे सीईओ आता…

संजय गुप्ता हे 1985 च्या बॅचचे IAS अधिकारी. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी UPSC, नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. ISS नोकरीनंतर 2002 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सरकारी नोकरी सोडल्यानंतर अदानी समूहाचे सीईओ म्हणून काम केले. पण, ती नोकरी सोडून त्यांनी लक्झरी हॉटेल चेन कॉम्बो लॉन्च केली. हा व्यवसाय त्याच्यासाठी फायदेशीर ठरला.

6 वर्षांच्या नोकरीनंतर राजीनामा

केरळचे रहिवासी बालगोपाल चंद्रशेखर हे 1976 च्या बॅचचे आयएएस अधिकारी. मणिपूर केडरमधून ते आयएएस झाले. पण, त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी केवळ 6 वर्षे काम केले. 1983 मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी भावासोबत बायोमेडिकल उपकरणे बनवणारी कंपनी सुरू केली. काही वर्षातच त्यांची कंपनी तेरुमो पेनपोलने चांगला नफा मिळवला.

टॉप सीईओ रोहित मोदी

1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले रोहित मोदी यांनी 14 वर्षे सरकारी नोकरी केली. 1999 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. यानंतर ते खासगी क्षेत्राकडे वळले. आज मोठ्या कंपन्या आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये आघाडीवर असलेला टॉप सीईओ म्हणून त्यांच नाव चर्चेत आहे. L&T, IDPL, Suzlon Energy, Gammon India आणि Essel Infra Limited चे CEO पदहि त्यांनी भूषविले आहे. प्रत्येक कंपनीला त्यांनी आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर स्वतःचे असे स्थान प्राप्त करून दिले आहे.

फहीम खानचं मालेगाव कनेक्शन, पोलिसांसोबत हुज्जत-दादागिरीचे व्हिडीओ समोर
फहीम खानचं मालेगाव कनेक्शन, पोलिसांसोबत हुज्जत-दादागिरीचे व्हिडीओ समोर.
नागपूर राड्यातील फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, तपासातून माहिती उघड
नागपूर राड्यातील फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, तपासातून माहिती उघड.
दिशा सालियनच्या वडिलांचे याचिकेतील गंभीर आरोप काय? कोण येणार गोत्यात?
दिशा सालियनच्या वडिलांचे याचिकेतील गंभीर आरोप काय? कोण येणार गोत्यात?.
भाजपची सत्ता असूनही कबर का हटवली जात नाही? कबरीचं संवर्धन सरकार काढेल?
भाजपची सत्ता असूनही कबर का हटवली जात नाही? कबरीचं संवर्धन सरकार काढेल?.
नागपुरात महिला पोलिसांचा विनयभंग, CM म्हणाले, 'त्यांना कबरीतूनही...'
नागपुरात महिला पोलिसांचा विनयभंग, CM म्हणाले, 'त्यांना कबरीतूनही...'.
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.