‘आता मी तर पक्का गांधीवादी; शस्त्र तर 30 वर्षांपूर्वीच खाली ठेवली’, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्याचे शपथपत्र, अनेकांनी लावला डोक्याला हात
JKLF Chief now Gandhian : महात्मा गांधी यांची जयंती नुकतीच 2 ऑक्टोबर रोजी झाली. आजकाल अनेक ड्रामेबाज गांधी हेच त्यांचे गुरू असल्याचा आणि ते त्यांचे परमभक्त असल्याचा दावा करतात. गांधीजींच्या पुतळ्याजवळ रडणाऱ्यांची पण कमी नाही. त्यात जम्मू आणि काश्मीरमधील या दहशतवादाची भर पडली आहे.
पाकिस्तानच्या बहकाव्यात येऊन जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंदूविरोधी आणि भारतविरोधी अनेक गट सक्रिय झाले. 1985 नंतर त्यांनी स्थानिकांवर अत्याचाराची परिसीमा गाठली. त्यात जम्मू आणि काश्मीर मुक्ती मोर्चा (JKLF) आघाडीवर होता. या संघटनेचा म्होरक्या यासीन मलिक हा दहशतवादी सध्या दिल्ली येथील तिहार तुरुंगात आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा आणि इतर अनेक गंभीर आरोप त्याच्यावरती आहेत. या फुटरीतावाद्याची संघटना पण फुटली आहे. जेकेएलएफ-वाय या संघटनेचा तो प्रमुख आहे. त्याच्या संघटनेवर बंदी आहे. ही बंदी उठवण्याची त्याची मागणी आहे. त्यासाठी त्याने UAPA न्यायाधिकरणासमोर हास्यास्पद दावा केला आहे. आपण आता पक्के गांधीवादी आहोत, असा दावा मलिकने केला आहे. 1994 मध्ये आपण शस्त्रे खाली ठेवली. तेव्हापासून हिंसा सोडल्याचा त्याचा दावा आहे.
हिंसेचा मार्ग सोडला, स्वतंत्र काश्मीरचा नाहीच
UAPA न्यायाधिकरणासमोर यासिन मलिक याने बाजू मांडली. त्याने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार 1994 मध्ये संयुक्त स्वतंत्र काश्मीरच्या मागणीसाठी त्याने आणि त्याच्या संघटनेने हिंसेचा मार्ग सोडून दिला. त्याने शस्त्र खाली ठेवली. तो गांधी विचाराने प्रभावित झाला. संयुक्त स्वतंत्र काश्मीरसाठी त्याने आता गांधीवादाचा मार्ग अंगिकारला आहे. त्याच मार्गाने त्याचे आंदोलन गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे.
34 वर्षांपूर्वी केली होती वायुदलातील कर्मचाऱ्यांची हत्या
आता शांतीचे गोडवे गाणाऱ्या यासिन मलिकचा इतिहास मात्र रक्तरंजित आहे. अनेक काश्मीरी पंडितांना त्याने आणि त्याच्या संघटनेने त्रास दिला आहे. त्यांचा छळ केला आहे. यासीन याने 1988 मध्ये जेकेएलएफची स्थापना केली होती. पाकिस्तानच्या पाठिंब्यावर त्याने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पोसला. दहशतवाद्यांच्या मदतीने त्याने 1990 मध्ये श्रीगनर येथील रावलपुरामध्ये वायुदलाच्या चार कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. यासीन या हत्याकांडातील सूत्रधार होता. साक्षीदारांनी यासिनला या खून खटल्यात मुख्य शूटर म्हणून ओळख पटवली होती.
NIA च्या तपासात यासीन याच्यावर दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा, त्यांना मदत केल्याचा ारोप कोर्टात सिद्ध झाला. त्यानंतर न्यायालयाने त्याला टेरर फंडिंग प्रकरणात मे 2022 मध्ये आजीवन कारवासाची शिक्षा सुनावली आहे. पण चांगल्या वर्तवणुकीच्या हमीवर त्याची बाहेर येण्याची तडफड सुरू आहे. कलम 370 हटवल्यानंतर अनेक दहशतवाद्यांना गांधी विचार जवळचे वाटत आहेत, हे विशेष.