आता परदेशी जातीचे पिटबुलसारखे आक्रमक श्वान पाळण्यास मनाई, या 23 ब्रीड्सवर बॅन
गेल्या काही वर्षांत परदेशी कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे अनेक जणांना प्राणास मुकावे लागले आहे. एका मातेचा आपल्या मुलाला वाचविताना व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. तसेच या श्वानांना नागरिकांवर त्यांच्या मालकांद्वारे मुद्दामहून सोडण्याचे घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने अशा परदेशी श्वानांच्या जातींवर बंदी घालण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत.
नवी दिल्ली | 13 मार्च 2024 : केंद्र सरकारने पिटबुल सारख्या आक्रमक जातींच्या कुत्र्यांद्वारे माणसांवर झालेल्या हल्ल्यामुळे आता या श्वानांवर बंदी आणण्याचा निर्णय जारी केला आहे. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयाने एक नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनूसार भारतातील संघ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 23 परदेशी श्वानांची पैदास आणि विक्रीसाठी परवाना न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हा निर्णय श्वानप्रेमींसाठी निराशादायक ठरणारा आहे. या जातीच्या कुत्र्यांद्वारे गेल्या काही वर्षांपासून अनेक जणांना गंभीर प्राणघातक हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. काही जणांचा त्यात मृत्यूही झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने हे नोटीफिकेशन काढले आहे.
दिल्ली येथे एका लिफ्टमध्ये कुत्र्याने लहानग्या चावा घेतल्याचा व्हीडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यामुळे वाढत्या अशा प्रकाराने केंद्र सरकारने याबाबत दखल घेतली आहे. विदेशी जातीचे एकूण 24 परदेशी जातींच कुत्रे पाळण्यावर बंदी घालण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. या जातीच्या कुत्र्यांच्या ( ब्रीडींग ) पैदाशीवरही बंदी घालण्यात आली आहे.
परदेशी जातीच्या श्वानांच्या प्रादुर्भावाची दखल केंद्र सरकारने घेत देशभरात त्यावर बंदी घातली आहे. या जातीच्या श्वानांच्या ब्रीडींगवरही बंदी घालण्याचीही सूचना करण्यात आली आहे. या जातीच्या कुत्र्यांना आता परवाना मिळणार नाही, असे पशुसंवर्धन मंत्रालयाने म्हटले आहे. हा नियम सर्व मिश्र आणि संकरित जातींना समान रीतीने लागू होईल असे सरकारने म्हटले आहे.
या परदेशी जातीच्या श्वानांच्या वापर बहुतेक देशात युद्धात केला जातो. या कुत्र्यांना घरात पाळणे धोकादायक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाने विदेशी कुत्र्यांच्या जातींची विक्री, पैदास किंवा संगोपनावर देखील बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. पशुसंवर्धन मंत्रालयाचे सचिव डॉ. ओ.पी. चौधरी यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून पिटबुल्स आणि मानवासाठी धोकादायक असलेल्या श्वानांच्या इतर प्रजातींना कोणताही परवाना देऊ नये असे म्हटले आहे.
या श्वानांवर बंदी
– पिटबुल टेरियर ( pit bull terriers )
– तोसा इनू ( Tosa Inu )
– अमेरिकन स्टॅफोर्डशायर टेरियर ( American Staffordshire Terrier )
– fila brasileiro
– डोगो अर्जेंटिनो ( Dogo Argentino )
– अमेरिकन बुलडॉग
– बोस्बोएल ( Boerboel )
– कंगल ( Kangal )
– मध्य आशियाई शेफर्ड
– कॉकेशियन शेफर्ड
– दक्षिण रशियन शेफर्ड
– टोनजॅक
– सरप्लॅनिनॅक
– जपानी टोसा आणि अकिता
– मास्टिफ्स
– रॉटलवेअर
– टेरियर
– रोडेशियन रिजबॅक
– वुल्फ डॉग
– canario
– अकबश
– मॉस्को गार्ड
– केन कार्सो