Train Ticket Booking : ट्रेनचं तिकीट आता दोन मिनिटांत होईल कन्फर्म, कसे ते पाहा
भारतीय रेल्वेने प्रवास करताना कन्फर्म तिकीट मिळणे गरजेचे असते. अनेकदा तिकीट बुक केल्यानंतर वेटिंग लीस्टची मोठी यादी हातात पडत असते. रेल्वेने दोन मिनिटांत आपल्याला कन्फर्म तिकीट मिळण्याची सुविधा देखील दिलेली आहे...
आता लवकरच सणासुदीचा हंगाम सुरु होणार आहे. तुम्ही फिरायला जायचे प्लान देखील आखले असतील. परंतू सुटीच्या हंगामात जादा मागणी असल्याने ट्रेनचे तिकीटची मोठी प्रतिक्षा यादी आपल्या हाती पडते. त्यामुळे आपला पिकनिकचा प्लान देखील धोक्यात येऊ शकतो. आता काही साध्या स्टेप्स फॉलो केल्या की आपल्या देखी कन्फर्म तिकीट मिळू शकते. त्यामुळे आपल्या हमखास प्रवास करता येतो. त्यामुळे चला तर पाहूयात कसे मिळवायचे कन्फर्म तिकीट….
भारतीय रेल्वेने आयत्यावेळी हमखास प्रवास करण्यासाठी ‘तात्काळ तिकीट’ ही सुविधा दिली आहे. या सुविधेनूसार आपण आपला प्रवास आदल्या दिवशी तत्काळ कोट्यातून तिकीट काढून हमखास कन्फर्म तिकीट काढू शकतो. हे तात्काळ तिकीट कसे काढायचे ते पाहूयात. या तात्काळ तिकीट बुकींगची ठराविक वेळ दिलेली असते. त्याचे वेळेत हे तिकीट काढावे लागते. ज्यांना तातडीचा हमखास प्रवास करायचा असतो. त्यांना थोडे जादा चार्ज आकारुन तात्काळ तिकीट काढता येते.
या सुविधेला ‘तात्काळ तिकीट’ असे साजेसे नाव दिले आहे. यात प्रवासाच्या आदल्या दिवशी आपल्याला तिकीट बुक करावे लागते. आता हे तात्काळ तिकीट कसे काढायचे ते पाहूयात…
तात्काल तिकीट बुकिंग विंडो केव्हा खुलते ?
एसी 3 – टियर, एसी 2 – टियर आणि फर्स्ट क्लास सारख्या श्रेणीसाठी बुकींग विंडो सकाळी 10 वाजता सुरु होते. तर स्लीपर क्लाससाठीचा स्लॉट सकाळी 11 वाजता सुरु होतो. प्रत्येक श्रेणीचे काही आसन तात्काळ बुकींग कोट्याअंतर्गत राखीव ठवलेली आहेत. चला तर पाहूयात तात्काळ तिकीट कसे बुक करतात.?
तात्काल तिकीट बुकींग असे करावे
सर्वात आधी तु्म्ही इंटरनेटवर IRCTC ची वेबसाईट उघडायची आहे.
तुम्हाला होमपेजच्या बाजूला उजव्या बाजूला कोपऱ्यात मेन्यूचा विकल्प दिसेल
यात तु्म्हाला लॉगइनचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करावे
त्यानंतर बुक तिकीट वर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये तुम्ही प्रवास सुरु करणाऱ्या बोर्डींग स्टेशनचे नाव टाका, नंतर तुमच्या डेस्टीनेशन्सचे ( गंतव्य स्थानक ) नाव TO मध्ये टाकावे..
त्यानंतर ड्रॉपडाऊन मेन्यू मध्ये Tatkal पर्यायाला सिलेक्ट करावे. हा बाय डिफॉल्ट General वर सेट असतो..
त्यानंतर प्रवासाची तारीख टाकावी, डिटेल्स टाकल्यानंतर सर्चवर क्लिक करावे..
त्यानंतर त्या मार्गाने जाणाऱ्या अनेक ट्रेनची नावे दिसतील
त्यानंतर तुम्हाला ज्या ट्रेनमध्ये ज्या श्रेणीची तिकीट काढायची त्यावर क्लिक करुन बुक नाऊवर क्लिक करावे
त्यानंतर तुम्हाला प्रवाशाची वैयक्तिक माहिती टाकावी लागेल.
तात्काळ तिकीट काढताना वेग दाखविणे गरजेचे आहे. जर तुम्ही मास्टर लिस्ट आधी तयार करुन ठेवली असेल तर तुम्हाला तपशिल भरायला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही एका क्लिकवरच पॅसेंजर समाविष्ट करु शकता.
त्यानंतर इतर तपशील भरावा, कॅप्चा टाकावा, मोबाईल नंबर टाकावा, त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी सांगितले जाईल, त्यानंतर तुम्ही पेमेंट करावे. त्यानंतर तुमचे तात्काळ तिकीट बुक होईल.