वंदे भारतच्या पुढचे पाऊल, देशात धावणार हायस्पीड ट्रेन, जाणून घ्या संपूर्ण प्रकल्प

| Updated on: Apr 14, 2023 | 4:46 PM

देशात बुलेट ट्रेनचे काम सुरु असताना आणखी एक नवीन प्रकल्पावर काम सुरु झाले आहे. त्यामुळे 220 किमी वेगाने रेल्वे धावणार आहे. ट्रॅकमध्ये 220 किमी प्रति तास ओव्हरहेड उपकरणे आणि सर्व प्रकारची सिग्नल यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे.

वंदे भारतच्या पुढचे पाऊल, देशात धावणार हायस्पीड ट्रेन, जाणून घ्या संपूर्ण प्रकल्प
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने सुरु आहे. बुलेट ट्रेनचा प्रकल्प सुरु आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. ऑगस्ट 2023 पर्यंत वंदे भारत ट्रेनची संख्या 75 करण्यात येणार आहे. लवकरच पुणे आणि मुंबईवरुन आणखी काही वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. परंतु अजून एक नवीन प्रकल्प देशात सुरु झाला आहे. यामुळे तुमचा प्रवाशाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. देशात हायस्पीड प्रकल्प सुरु होत आहे. त्याचे काम सुरु झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निश्चिय करण्यात येणार आहे. त्यावर २२० किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे.

काय आहे प्रकल्प


रेल्वेने आता सामान्य गाड्यांचा वेग वाढवण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी हायस्पीड ट्रेन टेस्टिंग ट्रॅक बांधण्यात येत आहे. या ट्रॅकवर ताशी 220 किमी वेग असलेल्या गाड्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. राजस्थानमधील जयपूरपासून 70 किमी अंतरावर असलेल्या गुढा-थथाना मिठाडी दरम्यान 59 किमी लांबीचा ब्रॉडगेज ट्रॅक तयार केला जात आहे. या ट्रॅकवर हायस्पीड गाड्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

वंदे भारतची चाचणी शक्य


आगामी काळात वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांच्या चाचणीसाठी हा हायटेक ट्रॅकचा वापरता येणार आहे. हा ट्रॅक प्रकल्प पूर्ण झाल्यावर रोलिंग स्टॉकसाठी आंतरराष्ट्रीय मानकांच्या सर्वसमावेशक चाचणीचा सुविधा असणारा भारत हा पहिला देश बनणार आहे, असा दावा रेल्वेने केला आहे. या हायस्पीड रेल्वे ट्रॅकची मेन लाइन 23 किमी असेल. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर डिसेंबर 2024 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे.

या ट्रॅकमध्ये 220 किमी प्रति तास ओव्हरहेड उपकरणे आणि सर्व प्रकारची सिग्नल यंत्रणा आहेत. सध्या 4.5 किमीचा ट्रॅक पूर्ण झाला आहे.

मुंबई-पुणे शहरातून ट्रेन

देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत ट्रेन वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली होती. आता मुंबई ते मडगाव, जबलपूर ते इंदूर, हावडा ते पुरी, सिकंदराबाद ते पुणे, तिरुवनंतपुरम ते मंगलुरु, चेन्नई एग्मोर ते कन्याकुमारी, मंगलुरु ते म्हैसूर, इंदौर ते जयपूर ट्रेन लवकरच सुरु होणार आहे.