Nupur Sharma : नुपूर शर्मावर अटकेची टांगती तलवार; ओवेसी आणि यति नरसिंहानंद यांच्याविरोधात FIR
नुपूर शर्माने एका टीव्ही डिबेट दरम्यान प्रेषित मंहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
नवी दिल्ली : प्रेषित मंहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना अटक होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा (Non-Bailable Crime) दाखल केला आहे. तर द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी यती नरसिंहानंद यांच्यासह 32 जणांविरुद्ध आणखी 2 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर महाराष्ट्र पोलिसांनी नवीन जिंदाल आणि नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना 15 आणि 22 जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. याच दरम्यान नुपूर शर्मा त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात दिल्लीतील जामा मशिदीत निदर्शने करण्यात आली. मुस्लीम समाजातील लोकांनी शुक्रवारच्या नमाजनंतर ही निदर्शने केली आहे. तसेच आंदोलकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यांना निलंबित करणे किंवा भाजपमधून बडतर्फ करणे इतकेच पुरेसे नसल्याचे म्हटले आहे. तर दिल्लीतही दिल्ली पोलिसांनी द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी नुपूर शर्मा विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यातील काही कलमे ही अजामीनपात्र आहेत. अशा परिस्थितीत आता नुपूर शर्माला अटक होऊ शकते असे मानले जात आहे.
नुपूर शर्माने एका टीव्ही डिबेट दरम्यान प्रेषित मंहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. तर मुस्लिम राष्ट्राकडून भारताने याबाबत माफी मागावी म्हणून दबाव वाढत आहे. त्यानंतर नुपूर शर्मा यांना भाजपने 6 वर्षांसाठी निलंबित केलं आहे. तर नवीन जिंदाल यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आलं आहे. मात्र त्यानंतरही सतत गदारोळ सुरूच आहे. याचवरून गेल्या आठवड्यात कानपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी नुपूर शर्मा विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
होऊ शकते अटक
प्रेषित मंहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने 6 वर्षांसाठी निलंबित केलं आहे. तर नवीन जिंदाल यांना भाजपमधून बडतर्फ केलं आहे. याचदरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी नुपूर शर्मा यांना समन्स बजावले होते. त्याला 22 जून रोजी बोलावण्यात आले आहे. दुसरीकडे, भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नवीन जिंदाल यांना महाराष्ट्र पोलिसांनी 15 जूनला हजर राहण्यास सांगितले आहे. तर दिल्लीतही दिल्ली पोलिसांनी द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी नुपूर शर्मा विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यातील काही कलमे ही अजामीनपात्र आहेत. अशा परिस्थितीत आता नुपूर शर्माला अटक होऊ शकते असे मानले जात आहे.
दिल्ली पोलिसांचे आवाहन
दरम्यान हेट स्पीच प्रकरणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडूण दिल्ली पोलिसांना माहिती मागवली आहे. तसेच वातावरण बिघडू शकते, अशा पोस्ट टाळा, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.
एफआयआरमध्ये गुन्ह्याचा उल्लेख नाही
एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्याविरोधात नोंदवलेल्या एफआयआरवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी पहिल्यांदाच अशी एफआयआर पाहिली आहे, ज्यामध्ये गुन्ह्याचा उल्लेख नाही. याला आम्ही घाबरत नाही. आम्ही आमच्या वकिलांशी सल्लामसलत करू आणि गरज पडल्यास त्याचे निराकरण करू.
एआयएमआय कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती
नुपूर शर्मा यांनी नुकतेच प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. नुपूर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत ओवेसी यांनी जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा केली होती. दिल्ली पोलिसांनी याला परवानगी दिली नाही. यानंतरही एआयएमआयएमच्या 25-30 महिला कार्यकर्त्यांनी संसद मार्ग पोलीस स्टेशन गाठून आंदोलन केले, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता पोलिसांनी ओवेसीविरुद्ध कलम 153, 295,505 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दिल्ली पोलिस पाठवणार नोटीस
दिल्ली पोलिसांनी यापूर्वीही द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी 8 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. भाजपचे माजी प्रवक्ते नवीन जिंदाल, पत्रकार सबा नक्वी, शादाब चौहान, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुर रहमान, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांच्या नावांचा समावेश होता. आता दिल्ली पोलिसांनी या लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे.