पतीला दिली दीड कोटी पॅकेजची ऑफर, रद्दी विकून कमवले 1 हजार कोटी…

| Updated on: Jan 30, 2024 | 9:11 PM

दिल्लीत जन्मलेल्या पूनम गुप्ता यांनी एका जिद्दीतून कंपनी सुरु केली आणि पहाता पहाता त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 1 हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली. त्यांच्या कंपनीचा व्यवसाय 60 देशांमध्ये पसरला आहे.

पतीला दिली दीड कोटी पॅकेजची ऑफर, रद्दी विकून कमवले 1 हजार कोटी...
POONAM GUPTA
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 30 जानेवारी 2024 : 2004 मध्ये त्यांनी कंपनी नोंदणीकृत केली. कंपनीचा नफा वाढत होता. त्यांच्या या व्यवसायात त्यांना मित्रमंडळी, कुटुंबाच्या सहाय्याची गरज भासू लागली. त्यांनी पतींना व्यवसायात सहभागी होण्यास सांगितले. त्यावेळी पतींचे वार्षिक पॅकेज 80 लाख रुपये होते. त्यामुळे त्यांनी पत्नीची पहिली ऑफर नाकारली. मग, तिने फक्त सहा महिन्यांसाठी कंपनीत अर्धवेळ काम करा अशी विनंती केली. त्यांनीही 6 महिने अर्धवेळ काम केलं. पुढे त्यांनी नोकरी सोडली. कारण, पत्नीनेच त्यांना 1.50 कोटींच्या पॅकेजची ऑफर दिली होती. त्यानंतर या जोडप्याने आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला.

दिल्लीत जन्मलेल्या पूनम गुप्ता यांच्याकडे एमबीएची पदवी होती. 2002 मध्ये त्यांचे पुनीत गुप्ता यांच्यासोबत ​​लग्न झाले. ते स्कॉटलंडमध्ये काम करायचे. लग्नानंतर पूनम याही पतीसोबत स्कॉटलंडला गेल्या. पूनम यांनी तिथे काम करण्याचा विचार केला. अनेक कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या. पण, कामाचा अनुभव नाही त्यामुळे नोकरीत नकार मिळत होता. अननुभवी आहे हे कारण देऊन त्यांना संधी नाकारण्यात आली.

स्कॉटलंड देशाच्या अर्थव्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला. त्यातून त्यांच्या एक बाब लक्षात आली की युरोपियन आणि अमेरिकन कंपन्या कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात कागद वापरतात. त्यामुळे शेकडो टन रद्दी कागद तयार होत असतात. त्या रद्दीची विल्हेवाट लावणं हा एक मोठा प्रश्न होता. कंपन्या त्यासाठी करोडो रुपये खर्च करत होते. यातूनच त्यांना एका नवी संकल्पना सुचली. त्यांनी फक्त एक लाख इतकी रक्कम गुंतवली आणि नवी कंपनी स्थापन केली.

पूनम गुप्ता यांनी याच रद्दी कागदाचा पुनर्वापर करून त्यापासून नवीन कागद तयार करण्याची कंपनी सुरु केली. एका इटालियन कंपनीकडून त्यांनी रद्दी खरेदी केली. व्यवसाय नवा आहे त्यामुळे रद्दीचे पैसे काही दिवसांनी देऊ असे त्यांनी त्या कंपनीला कळविले. त्या कंपनीनेही आढे वेढे घेतले नाही. पूनम यांनी ती रद्दी भारतातल्या एका कंपनीला विकली. या पहिल्याच व्यवहारात त्यांची कमाई 40 लाख रुपये इतकी होती.

पहिल्याच कामातून पूनम यांनी प्रचंड नफा कमावला. त्यानंतर मात्र त्यांनी या व्यवसात अधिक लक्ष घातले. इटली, फिनलंड, स्वीडन आणि युनायटेड स्टेट्समधील देशांतून त्यांनी रद्दी कागद विकत घेण्यास सुरवात केली. त्या रद्दीपासून उत्तम दर्जाचा कागद तयार करून त्यांनी तो अन्य देशात विकण्यास सुरवात केली. त्यांच्या कंपनीचा व्यवसाय आता अनेक देशांमध्ये पसरला आहे.