OLA | तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी, उत्पन्न घटल्याने ‘ओला’वर वाईट वेळ

गेल्या दोन महिन्यांमध्ये कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे.

OLA | तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी, उत्पन्न घटल्याने 'ओला'वर वाईट वेळ
Follow us
| Updated on: May 20, 2020 | 5:53 PM

नवी दिल्ली : टॅक्सी सेवा पुरवणारी कंपनी ओलाने देशभरातील त्यांच्या 1400 कर्मचाऱ्यांना (OLA Fired 1400 Employees) नोकरीवरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी एक नोटीस जारी करत याबाबतची माहिती दिली. कोरोनामुळे (Corona Pandemic) कंपनीचं उत्पन्न घटल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे, असं भावेश अग्रवाल यांनी (OLA Fired 1400 Employees) सांगितलं.

गेल्या दोन महिन्यांमध्ये कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे, असं भावेश अग्रवाल यांनी या नोटीसमध्ये सांगितलं. भावेश अग्रवाल यांच्या मते, गेल्या दोन महिन्यांमध्ये कंपनीचं उत्पन्न 95 टक्क्यांनी कमी झालं आहे. त्यामुळे कंपनीवर ही वाईट वेळ आली आहे.

देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून ओलाने कॅब सर्व्हिसेस बंद केल्या होत्या. त्यामुळे कॅब व्यवसायावर मोठा परिणाम झाला (OLA Fired 1400 Employees).

उबरही 3000 कर्मचाऱ्यांना काढणार

कोविड-19 मुळे उबरनेही जगभरातील आपल्या 3,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची घोषणा केली. कोरोनामुळे कंपनीपुढे अनेक आर्थिक आव्हानं उभी झाली आहेत. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचं उबरने सांगितलं.

स्विगी, झोमॅटोही कर्मचाऱ्यांना काढणार

त्याशिवाय, फूड डिलीव्हरी करणाऱ्या कंपनी स्विगी आणि झोमॅटोनेही कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्विगी येत्या काही दिवसात त्यांच्या 1100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार आहे. तर झोमॅटोही त्यांच्या 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार आहे.

OLA Fired 1400 Employees

संबंधित बातम्या :

Non AC Train | 1 जूनपासून वेळापत्रकानुसार 200 नॉन AC रेल्वे सुरु, रेल्वे मंत्र्यांची घोषणा

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन WHO च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होणार

‘ओयो’च्या कर्मचार्‍यांच्या वेतनात 25 टक्के कपात, चार महिन्यांच्या सुट्टीवर पाठवण्याचीही चाचपणी

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या पार, कोणत्या राज्यात किती रुग्ण?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.