Article 370 हटवल्यानंतर मोदींचा जुना फोटो व्हायरल
कलम 370 हटवा बॅनरसोबतचा पंतप्रधान मोदी यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वेगवेगळ्या कॅप्शनसोबत हा फोटो शेअर केला जात आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत संविधानातील ‘कलम 370’ (Article 370) ला हद्दपार करण्याचा प्रस्ताव ठेवला. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली. या प्रस्तावानुसार, जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश असतील. तर लडाख हा दूसरा केंद्रशासित प्रदेश असेल.
Promise fulfilled pic.twitter.com/iiHQtFxopd
— Ram Madhav (@rammadhavbjp) August 5, 2019
जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राष्ट्रीय महासचिव आणि वरिष्ठ नेते राम माधव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एक जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यामागे एक बॅनर लावलेलं आहे. या बॅनरवर “कलम 370 हटवा, दहशतवाद मिटवा, देश वाचवा”, अशी घोषणा लिहिलेली आहे. ‘वचन पूर्ण केलं’, असं कॅप्शन राम माधव यांनी या फोटोला दिलं.
What a glorious day. Finally d martyrdom of thousands starting with Dr Shyam Prasad Mukharjee for compete integration of J&K into Indian Union is being honoured and d seven decade old demand of d entire nation being realised in front of our eyes; in our life time.Ever imagined??
— Ram Madhav (@rammadhavbjp) August 5, 2019
‘हा एक ऐतिहासिक दिवस आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जीसह हजारों शहीदांच्या राज्याच्या संपूर्ण विलीनीकरणाच्या इच्छेचा मान ठेवण्यात आला. देशाची सात दशकं जुनी मागणी आज आपल्या डोळ्यांसमोर अखेर पूर्ण झाली. कधी विचार केला होता, असं काही होईल?’, असंही राम माधव यांनी लिहिलं.
कलम 370 हटवा बॅनरसोबतचा पंतप्रधान मोदी यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वेगवेगळ्या कॅप्शनसोबत हा फोटो शेअर केला जात आहे.
Sau sau Salaam aapko ! pic.twitter.com/OnFcMlM5T0
— Paresh Rawal (@SirPareshRawal) August 5, 2019
हेही वाचा : कलम 370 काढण्याला कोणत्या पक्षाचा पाठिंबा आणि कुणाचा विरोध?
जम्मू -काश्मीरबाबतच्या 5 महत्वाच्या घडामोडी
1) कलम 370 हटवल्याने विशेष अधिकार संपुष्टात
2) जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित राज्यांची निर्मिती
3) भारतीय संविधानातील सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू
4) जम्मू काश्मीरची वेगळी घटना आणि झेंडा संपुष्टात
5) सर्वांना मालमत्ता खरेदी-विक्रीचा अधिकार
अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू काश्मीरबाबात दोन संकल्प आणि दोन विधेयकं सादर केली. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. यादरम्यान अमित शाहांनी जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचं विधेयक सादर केलं. यानुसार जम्मू काश्मीरमधून लडाख वेगळं केलं. लडाख हे विधानसभा नसलेलं, तर जम्मू काश्मीर विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश असेल.
हेही वाचा : Article 370 | राष्ट्रपतींचा तो आदेश, ज्याने कलम 370 हटवलं!
कलम 370 हटवलं तर काय होईल?
- जम्मू काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा राहणार नाही.
- एखादा नवा कायदा लागू करायला राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसेल.
- त्यामुळे राज्याच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करु शकेल.
- 370 कलम हटवल्याने संपत्ती खरेदीचा आणि गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल.
- 370 कलमांतर्गत 35 A मुळे मिळालेले अधिकारही निघून जातील.
- जम्मू काश्मीरमधील स्वतंत्र संविधान इतिहासजमा होईल, भारतीय राज्यघटना पाळावी लागेल
- भारतीय संसद सर्वोच्च असेल
- जम्मू काश्मीरमधील दुहेरी नागरिकत्व संपुष्टात
- भारतीयांना काश्मीरमध्ये मालमत्ता विकत घेण्याचा आता अधिकार
VIDEO :