Chaitra Navratri 2022 : चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेच्या दरबारात भक्तांची गर्दी, मोदींसह या नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
आजपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri) सुरूवात झाली आहे. आज चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाचे औचित्य साधून शनिवारी नवी दिल्लीतील (New Delhi) झंडेवालान मंदिरात पहाटे 'आरती' करण्यात आली. आज भक्त मंदिरात प्रार्थना करतात आणि दुर्गा देवीचा आशीर्वाद घेतात.
नवी दिल्ली – आजपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri) सुरूवात झाली आहे. आज चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाचे औचित्य साधून शनिवारी नवी दिल्लीतील (New Delhi) झंडेवालान मंदिरात पहाटे ‘आरती’ करण्यात आली. आज भक्त मंदिरात प्रार्थना करतात आणि दुर्गा देवीचा आशीर्वाद घेतात. झंडेवालान टेंपल ट्रस्टचे रवींद्र गोयल यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मी नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या खास प्रसंगी देशभरातील नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुध्दा ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. शक्तीच्या उपासनेचा हा सण सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा देईल. गुढीपाडवा आणि उगादी सणाच्या शुभेच्छा असा आशय त्यांच्या ट्विट मध्ये आहे.
सभी देशवासियों को नवरात्रि की बधाई। शक्ति की उपासना का यह पर्व हर किसी के जीवन में नई ऊर्जा का संचार करे।
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2022
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी देशवासियांना चैत्र शुक्लदी, उगादी, गुढी पाडवा, चेती चंद, नवरेह आणि साजिबू चेरोबाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाले, ‘चैत्र शुक्लदी, उगादी, गुढी पाडवा, चेती चंद, नवरेह आणि साजिबू चेरोबा सणांच्या शुभ मुहूर्तावर, मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो.
समाजात एकोपा आणि एकात्मतेची भावना दृढ होते
वसंत ऋतूसोबतच, भारतीय नववर्षाच्या शुभेच्छांचे स्वागत देशभरात विविध स्वरूपात साजरे केले जाते. हे सण आपल्याला सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेच्या धाग्यात बांधून ठेवतात. या आनंदाच्या उत्सवांतून आपल्या समाजात एकोपा आणि एकात्मतेची भावना दृढ होते. या सणांमुळे प्रत्येकाच्या जीवनात परस्पर प्रेम आणि सद्भावना पसरावी आणि आपण सर्वांनी मिळून या नवीन वर्षात नव्या उमेदीने राष्ट्र उभारणीत हातभार लावावा, अशी माझी इच्छा आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
हे सण पारंपारिक नवीन वर्षाची सुरुवात करतात
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ‘उगादी, गुढी पाडवा, चैत्र शुक्लदी आणि चेती चांद’ च्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. उगादी, गुढीपाडवा, चैत्र शुक्लदी आणि चेती चंद या आनंददायी आणि शुभ मुहूर्तावर मी आपल्या देशातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण पारंपारिक नवीन वर्षाची सुरुवात करतात. आपल्या जीवनात नवीन आशा आणि आनंद आणतात. आपल्या देशातील विविध राज्यांमध्ये विविध पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. सण आपली समृद्ध सांस्कृतिक विविधता आणि त्यात अंतर्भूत असलेली एकता दर्शवतात. हा सण आपल्या देशात समृद्धी आणि समृद्धी घेऊन येवो आणि देशातील लोकांमधील बंधुभावाचे बंध अधिक दृढ करील अशी माझी इच्छा व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली.