होळी आणि Women’s Day साठी मोठं गिफ्ट, बसमधून मोफत प्रवासाची संधी

International Women's Day special offer | आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशभरात विविध स्तरांवर विशेष उपक्रमांचं आयोजन करण्यात येतंय.

होळी आणि Women's Day साठी मोठं गिफ्ट, बसमधून मोफत प्रवासाची संधी
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 10:41 AM

International Women’s Day |  होळी (Holi), धुळवड (Dhulwad) आणि महिला दिनाचा उत्साह देशभरात पहायला मिळतोय. येत्या ८ मार्च रोजी धुळवड आणि महिला दिन (Women’s Day Special) एकत्र आलाय. त्यामुळे विविध संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम राबवले जात आहेत. राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त राज्यात महिला, युवती आणि लहान मुलींना बसमधून मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राजस्थानच्या रोडवेज प्रशासनाच्या वतीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. साध्या तसेच एक्सप्रेस बससाठीदेखील ही सुविधा देण्यात येईल, असे गहलोत सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

8 मार्च रोजी मोफत प्रवास

राजस्थानमधील महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बसने मोफत प्रवासाची संधी दिली जातेय. 7 मार्च रोजी रात्री  12 वाजेपासून 8 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ही सुविधा सुरु असेल. या सुविधेसाठी रोडवेज प्रशासनाने 7.50 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. राजस्थान राज्याच्या सीमेअंतर्गतच ही सुविधा मिळेल. एखाद्या महिलेला राजस्थानमधून दुसऱ्या राज्यातील शहरात जायचं असेल तर राजस्थानच्या सीमेपर्यंतचं तिकिट तिला मोफत देण्यात येईल. त्यापुढे ही योजना लागू होणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

1 एप्रिलपासून महिलांचे तिकिट अर्धे

राजस्थान रोडवेजच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आणखी एक योजना जारी करण्यात आली आहे. महिलांना अर्धेच तिकिटदर लागू होतील. कोणत्याही तिकिटावर महिलांना 50 टक्के सूट देण्यात येईल. या आधी ही सवलत 30 टक्के होती. मात्र येत्या1 एप्रिलपासून यात अतिरिक्त 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयाद्वारे राजस्थान सरकारवर वर्षाला जवळपास 3.50 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडेल.

मध्यप्रदेशात अनोखा उपक्रम

तर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मध्य प्रदेश सरकारने अनोखा उपक्रम राबवण्याचे नियोजन केले आहे. यंदा ८ मार्च रोजी महिला दिनीच धुळवड आहे. त्यामुळे ६ मार्च रोजी हा उपक्रम राबवण्यात येईल. महिलांचा आत्मविश्वास आणि आत्म सन्मान वाढवण्यासाठी मध्य प्रदेशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये महिला ट्रॅफिक पोलीस तैनात असतील. सर्व पोलीस विभागातील महिला कर्मचारी या दिवशी शहरांतील सिग्नल आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये ड्युटीवर असतील.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.