सावधान ! पुन्हा कोरोना डोके वर काढतोय, सलग तीन आठवड्यापासून रुग्ण संख्येचा वाढता आलेख; मृत्यूदर मात्र स्थिर

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3314 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 3314 नव्या कोरोनाबाधितांसह एकूण कोरोबाधितांचा आकडा हा 43082502 वर पोहोचला आहे.

सावधान ! पुन्हा कोरोना डोके वर काढतोय, सलग तीन आठवड्यापासून रुग्ण संख्येचा वाढता आलेख; मृत्यूदर मात्र स्थिर
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 11:42 AM

भारतात पुन्हा एका कोरोनाने (Corona) हात -पाय पसरायला सुरुवात केली आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात देशात कोरोना रुग्णांचा (Corona patient) आलेख वाढता राहिला आहे. गेल्या आठवड्यात 25 एप्रिल ते 1 मे या कालावधित 22,200 हून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. ही कोरोना रुग्णांची आकडेवारी त्यापूर्वी संपलेल्या आठवड्याच्या तुलनेत 41 टक्क्यांनी अधिक आहे. या काळात 15,800 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकार (Central Government) अलर्ट मोडवर आल्याचे पहायला मिळत असून, कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विषेश म्हणजे यातील सुमारे 68 टक्के कोरोना रुग्ण हे दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये आढळून येत आहेत. या सर्व प्रकरणात दिलासादायक बातमी म्हणजे जरी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी देखील मृत्यूचा दर स्थिर असून, त्यामध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर

देशात गेल्या आठवड्यात 22,200 हून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यातील जवळपास 68 टक्के कोरोना रुग्ण हे दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यात आढळून आले आहेत. दिल्लीमध्ये कोरोना परिस्थिती भिषण बनत असून, गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये दररोज सरासरी एक हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनची लागन झालेले आहेत. ओमिक्रॉन व्हेरियटंची लक्षणे ही कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा सौम्य असल्याने मृत्यूचा दर कमी आहे. केद्राकडून वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद देखील साधला आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 3314 नव्या कोरोना रुग्णांचे निदान

दरम्यान देशात गेल्या 24 तासांमध्ये 3314 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 3314 नव्या कोरोनाबाधितांसह एकूण कोरोबाधितांचा आकडा हा 43082502 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 42536253 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 5 लाख 23 हजार 843 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची चौथी संभाव्य लाट पहाता पुन्हा एकदा मास्कसक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.