एक देश, एक निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधकांची समिती जाहीर, पहा कुणाचा आहे समावेश

भाजपचे संसदेत बहुमत आहे. द्र सरकारचे बहुमताच्या बळावर हे विधेयक पास करून घेईल आणि एक देश एक निवडणूक विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, आता या विधेकाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

एक देश, एक निवडणूक, सत्ताधारी आणि विरोधकांची समिती जाहीर, पहा कुणाचा आहे समावेश
PM NARENDRA MODIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 10:32 PM

नवी दिल्ली : 2 सप्टेंबर 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी One Nation, One Election ची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने त्यांनी पावले टाकण्यास सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने पाच दिवसांचे एक विशेष अधिवेशन बोलावलं आहे. 18 ते 22 सप्टेंबर असे हे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन असणार आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले आणि लगेचच ही घोषणा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात महत्वाची सहा विधेयक मांडण्यात येणार आहेत. त्यापैकी एक देश एक निवडणूक हे विधेयकही संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

1952 मध्ये देशात सर्वात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यानंतर सर्व राज्यांमध्ये त्यांच्या कायदेमंडळाच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे त्यावेळी दर पाच वर्षांनी देशाची लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होत होत्या. कालांतराने या कालावधीत तफावत निर्माण झाली. मात्र, आता पुन्हा या निवडणुका एकत्र घेण्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

एक देश, एक निवडणूक समितीमध्ये कोण आहेत?

केंद्र सरकारने एक देश, एक निवडणूक समितीची अधिसूचना आज जारी केली आहे. या समितीमध्ये आठ जणांचा समावेश आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या आठ सदस्यीय समितीचे अध्यक्ष आहेत. गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, एन के सिंग, सुभाष सी कश्यप, हरीश साळवे आणि संजय कोठारी हे या समितीचे अन्य सदस्य आहेत.

एक देश, एक निवडणूक ही समिती लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची शक्यता तपासणार आहेत. केवळ लोकसभा आणि विधानसभा नाही तर नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्राम पंचायतींच्या निवडणुकासुद्धा एकाच वेळी घेण्याबाबत ही समिती चर्चा करणार आहे. तसेच, त्रिशंकू विधानसभा, अविश्वास प्रस्ताव, आणि पक्षांतर याबाबतचाही निर्णय ही समिती घेणार आहे.

दरम्यान, ऐन गणेशोत्सव काळात संसदेचे अधिवेशन घेतल्यामुळे शिवसेनेने ( उद्धव ठाकरे ) गटाने नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवच्या काळात अधिवेशन बोलावणे दुर्देव असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.