एकाचा मृत्यू, १५ बेपत्ता; या धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी

भाविकांची गर्दी गुरुवारी मोठ्या प्रमाणात झाल्याने इंदौर-भोपाळ हायवेवर जाम लागला. भाविकांना पायी चालणे कठीण झाले होते. सीहोर रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर मोठी गर्दी होती.

एकाचा मृत्यू, १५ बेपत्ता; या धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 2:08 PM

सीहोर : कथावाचक प्रदीप मिश्रा यांचे आश्रम कुबेरेश्वर धाममध्ये शिवमहापुराण कथा आणि सात दिवसीय रुद्राक्ष वितरण महोत्सव सुरू आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दहा लाख भाविकांनी हजेरी लावली. यामुळं इथली आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली. गर्दीत चक्कर येऊन पडलेल्या महिलाचा मृत्यू झाला. काल झालेल्या गोंधळानंतर सुमारे १५ जण बेपत्ता आहेत. तसेच सुमारे दोन हजार भाविक आजारी पडले. समितीकडून गुरुवारी रात्री रुद्राक्ष वितरण थांबविण्यात आलं. तरीही भाविकाचं कुबेरेश्वर धाम येथे पोहचणे सुरूच आहे. बेपत्ता असलेल्या भाविकांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेत.

रेल्वे, बसस्थानकावर हजारो भाविक

भाविकांच्या गर्दीमुळे प्रशासन नियंत्रण ठेऊ शकत नाही. कुबेरेश्वर धामच्या जवळपास राहणारे शेतकरी यामुळे त्रासले आहेत. भाविक ज्यांच्या शेतातून जातात त्यांचे नुकसान होते. रेल्वे स्थानक व बस स्थानकावर लोकांची गर्दी आहे.

चक्कर येऊन पडलेल्या नाशिकच्या महिलेचा मृत्यू

गुरुवारी गर्दीत एक महिला चक्कर येऊन पडली. तिचा मृत्यू झाला. ही महिला नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावची रहिवासी आहे. मंगलाबाई असे तिचे नाव आहे. महिलेला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जाते. महिलेला रुग्णालयात पोहचविण्यात आले. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दहा तास इंदौर-भोपाळ हायवे जाम

भाविकाची गर्दी गुरुवारी मोठ्या प्रमाणात झाल्याने इंदौर-भोपाळ हायवेवर जाम लागला. भाविकांना पायी चालणे कठीण झाले होते. सीहोर रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर मोठी गर्दी होती. टोल टॅक्स नाक्यावर कित्तेक वाहनं उभी होती.

गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द

कुबेरेश्वर धाममध्ये १६ ते २२ फेब्रुवारीपर्यंत महोत्सव आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यात सहभागी होणार होते. शिव महापुराण कथेत जाण्याचा कार्यक्रम नियोजित होता. गर्दी असल्यामुळे त्यांचा कार्यक्रम रद्द झाला. माजी मुख्यमंत्री कमलनाथ १८ फेब्रुवारीला कुबेरेश्वर धामला जाऊ शकतात.

यात्रा म्हटलं की गर्दी आलीच. अशा गर्दीच्या ठिकाणी आवश्यक त्या सुखसोयी अपुऱ्या पडतात. त्यामुळं भाविकांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं गर्दीच्या ठिकाणी जाताना जरा जपून, असचं यानिमित्तं म्हणावसं वाटते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.