नवी दिल्ली | 6 डिसेंबर 2023 : Apaar Card आता देशातील विद्यार्थ्याची ओळख ठरणार आहे. देशातील विद्यार्थ्यांसाठी एकच अभ्यासक्रम असावा यासाठी चर्चा सुरु आहे. त्यातच आता ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’, या योजनेला लवकरच सुरुवात होत आहे. Apaar Card असे त्याचे नाव आहे. आधार कार्ड सोबतच हे कार्ड विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असेल. एक देश, एक विद्यार्थी या संकल्पनेवर हे कार्ड असेल. येत्या काळात विद्यार्थ्यांना हे कार्ड विविध शाळेतील प्रवेशापासून ते नोकरी लागेपर्यंत उपयोगी ठरेल. हे कार्ड कुठे आणि कसे तयार होणार आहे, त्याचा फायदा काय असे प्रश्न अनेकांना पडले आहेत, जाणून घ्या त्याची माहिती…
विशेष ओळख कार्ड
अपार कार्ड हे एक राष्ट्र , एक विद्यार्थी या संकल्पनेवर आधारीत ओळखपत्र असेल. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत (NEP,2020) हे ओळखपत्र असेल. आधार कार्डच्या धरतीवर हे कार्ड पण विशिष्ट ओळख क्रमांक असेल. ‘ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री’ असे अपार कार्डचे सविस्तर नाव आहे. हे कार्ड 12 अंकांचे आहे. ‘अपार कार्ड’ मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येईल. हे कार्ड म्हणजे त्यांचे शैक्षणिक माहितीपत्रच आहे.
काय आहे Aadhaar ID
‘अपार कार्ड’ मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येणार आहे. या कार्डमध्ये विद्यार्थ्याची सर्व शैक्षणिक, क्रीडा आणि शिष्यवृत्तीबाबतची माहिती जतन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याने कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला कोणती बक्षिसं मिळाली, प्रमाणपत्र मिळाली. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता याची माहिती यामध्ये असेल. विद्यार्थ्याची शाळा बदलली तरी हा रेकॉर्ड कायम असेल. तो प्रत्येक शाळेत अपडेट करण्यात येईल.
अशी होईल विद्यार्थ्याची नोंदणी
अशी होईल नोंदणी