एक तृतीयपंथी, दुसरा पानवाला, एक कोटींचा मामला, लागला असा चुना…

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु झाले आणि पवनचा धंदा बसला. धंद्यात नुकसान झाले. कर्ज वाढले. हे कर्ज फेडण्यासाठी काय करावे या विचारात तो गढला. अखेर त्याने नको ते पाऊल उचललं.

एक तृतीयपंथी, दुसरा पानवाला, एक कोटींचा मामला, लागला असा चुना...
TRANSGENDER AND PAN TAPRIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 4:46 PM

नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या लक्ष्मी नगर येथील एका तृतीयपंथीचं आलिशान घर होतं. घरात सोन्याचे दागदागिने, रोख रक्कम, चांदीच्या महागड्या वस्तू आदी ऐवज होता. या ऐवजाची किंमत कोटींच्या घरात होती. या घरावर काही जण पाळत ठेवून होते. याच घराशेजारी पवन जयस्वाल हा अनेक वर्षांपासून पानाचा धंदा करत होता. त्याचाही त्याचाही धंद्यात बऱ्यापैकी जम बसला होता. पण, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु झाले आणि पवनचा धंदा बसला. धंद्यात नुकसान झाले. कर्ज वाढले. हे कर्ज फेडण्यासाठी काय करावे या विचारात तो गढला. अखेर त्याने नको ते पाऊल उचललं.

पवन याचे लॉकडाऊन काळात व्यवसायात खूप नुकसान झाले. लाखोंचे कर्ज झाले होते. ते कसे फेडावे याचा विचार करता होता. त्याचवेळी त्याला तो तृतीयपंथी खूप श्रीमंत असून त्याच्या घरात कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने त्या दरोडा घालण्याचा कट रचला. पवन याने मित्र सनी उर्फ ​​अरमान याला गाठले. त्याला आपल्या कटात सामील करून घेतले. अरमान याने आपल्या काही साथीदारांना सोबत घेतले. ते सर्व दरोड्याची तयारी करू लागले.

हे सुद्धा वाचा

अरमान याने तृतीयपंथी याच्या घरी दरोडा घालण्यापूर्वी लक्ष्मीनगरला पवन याची भेट घेतली. त्यानंतर आपल्या साथीदारांसह दरोडा टाकून तो पळून गेला. दरोडा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दरोडा पडलेलले घर गाठले. त्यावेळी त्यांना मुखवटा घातलेल्या चार जणांनी आपल्याला ओलीस ठेवले आणि संपूर्ण घर लुटून पळून गेल्याची तक्रार पीडितेने केली.

भरदिवसा घालण्यात आलेल्या या दरोड्याच्या घटनेचा दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी प्रथम घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यावरून त्यांनी लक्ष्मी नगर ते नोएडाच्या नया बन्सपर्यंत असलेली सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातील एका सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसले. पोलिसांनी त्याआधारे तपास सुरु केला.

लक्ष्मी नगरमधील एका फुटेजमध्ये पोलिसांना संशयित तरुण एका व्यक्तीसोबत बोलताना दिसला. त्याची ओळख पटली तो पवन जैस्वाल निघाला. पोलिसांनी पवनला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पवनने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवले तेव्हा त्याने पोलिसांना दरोड्याच्या संपूर्ण कटाची माहिती दिली. लॉकडाऊनमध्ये व्यवसायात मोठे नुकसान झाल्यामुळे हा कट रचल्याचे कबुली दिली.

पवन याने दिलेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी दिल्ली आणि पंजाबमधून तीन जणांना अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी 70 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, 6.5 लाख रोख, 2 किलो चांदीचे दागिने, 5 खेळण्यांच्या बंदुका, एक पिस्तूल आणि लुटीच्या पैशाने खरेदी केलेला आयफोनही जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.