सुंदर महिलांनाच आश्रमात एन्ट्री, दुधाने अंघोळ; भोलेबाबाचे काळेधंदे ऐकून प्रचंड खळबळ
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 2 जुलै रोजी एका सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी होऊन 121 जणांचा मृत्यू झाला होता तर 30 हून अधिक जण जखमी झाले होते. हा सत्संग सूरजपाल नावाच्या स्वयंभू बाबाचा होता. या घटनेनंतर सूरजपाल उर्फ भोले बाबाबाबत अनेक मोठे खुलासे झाले आहेत. त्याच्यांबद्दल बरीच माहितीदेखील समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 2 जुलै रोजी एका सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी होऊन 121 जणांचा मृत्यू झाला होता तर 30 हून अधिक जण जखमी झाले होते. हा सत्संग सूरजपाल नावाच्या स्वयंभू बाबाचा होता. या घटनेनंतर सूरजपाल उर्फ भोले बाबाबाबत अनेक मोठे खुलासे झाले आहेत. त्याच्यांबद्दल बरीच माहितीदेखील समोर आली आहे. एका वृत्तवाहनीशी बोलताना हिंदू धर्मगुरू साध्वी विश्वरूपा यांनी दावा केला की, सूरजपाल आपल्या आश्रमात फक्त त्या सुंदर महिलांनाच प्रवेश देत असत, ज्या त्यांना दुधाने आंघोळ घालायच्या. धक्कादायक गोष्ट म्हणेज त्याच दुधापासून बनवलेली खीर बाबांच्या भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
सत्संगाचे व्हिडीओ बनवण्यावर होती बंदी
साध्वी विश्वरूपा यांनी दावा केला की, ‘प्रत्येकाने जागे झाले पाहिजे. योग्य-अयोग्य याची जाणीव असायला हवी. आपल्या प्रवचनांमध्ये त्यांनी ‘मानवता’ आणि ‘सत्याचा शोध’ असे शब्द वापरले. पण जेव्हा त्यांच्यासमोर चेंगराचेंगरी होत होती, लोक चिरडले जात होते तेव्हाच भोलेबाबा तिथून पळून गेले, तेव्हा त्यांनी कोणती माणुसकी दाखवली ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तिथे मोबाईल फोनवरही बंदी होती, व्हिडीओ बनवण्यावरही बंदी होती.
भोले बाबा दुधाने करायचे स्नान
‘काही दिवसांपूर्वी मी त्याच्या दौसा येथील आश्रमाबद्दल एक बातमी पाहत होते की, तो फक्त सुंदर महिलांची निवड करून त्यांना आपल्याजवळ ठेवायचा. आश्रमाच्या आजूबाजूला राहणारे लोक सांगतात की तो सुंदर महिलांना सोबत ठेवायचा. त्या महिला त्यांना आंघोळ दुधाने आंघोळ घालायच्या. ते दूध पाइपमधून जायचं आणि त्यातून खीर बनवून सर्व भक्तांना प्रसाद म्हणून दिली जायची.’ असा धक्कादायक दावा साध्वी विश्वरूपा यांनी केला.
मात्र हा सर्व दावा साध्वी विश्वरूपा यांनी केला असून त्याला कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान नारायण साकार विश्व हरी उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी न्यायिक तपास आयोगाचे पथक (Judicial Commission) शनिवारी हातरसला पोहोचले होते. आयोगाचे अध्यक्ष ब्रजेश कुमार श्रीवास्तव आणि आयपीएस भावेश कुमार यांनी या घटनेबाबत अनेकांची चौकशी केली.
आत्तापर्यंत ९ जणांना अटक
या पथकाने शनिवारी हातरस येथे जाऊन राष्ट्रीय महामार्ग 91 वरील फुलराई गावाजवळील घटनास्थळाला भेट दिली. रविवारी सकाळी या टीमने अलीगड रोडलगत पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसवर तळ ठोकला आणि तपास सुरू केला. या घटनेनंतर आतापर्यंत मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. सत्संग सभेसाठी राजकीय पक्षाने केलेल्या निधीचीही चौकशी करत असल्याचे हातरस पोलिसांनी सांगितले. यामध्ये काही संशयास्पद आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल