ऑपरेशन ब्ल्यू स्टार…. सुवर्ण मंदिरातील रक्तरंजित रात्र, पंजाब वाचवण्यासाठी पंतप्रधानांची प्राणांची आहुती
ऑपरेशन ब्ल्यू स्टारबद्दल सर्वांनी ऐकलं असेल की अमृतरसमधील सुवर्ण मंदिरामध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन केलं गेलं होतं. या ऑपरेशनमुळे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपले प्राण गमवावे लागले होते. ऑपरेशन ब्लू स्टार आधी पंजाबमधील परिस्थिती काय होती? ऑपरेशन ब्ल्यू स्टार करण्याचा मोठा निर्णय का घ्यावा लागला? जाणून घ्या.
भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला होता त्यासोबतच भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांची फाळणी झाली होती. या फाळणीमध्ये पंजाब प्रांताला मोठा फटका बसलेला. कारण पंजाबचेच दोन भागात विभाजन झाले होते. पंजाबला प्रांत स्वतंत्र करण्याची मागणी आधीपासूनच म्हणजेच स्वातंत्र्यपुर्व काळातच केली जात होती. भारत स्वतंत्र झाल्यावर पुन्हा एकदा ही मागणी होऊ लागली होती. भारत सरकारने 1953 मध्ये राज्य पुनर्गठन आयोगाची स्थापना केली होती. पंजाबचं विभाजन करून पंजाबी भाषा बोलणारे आणि पंजाबी न बोलणारे असं विभाजन करण्यात यावं. मात्र आयोगाने पंजाबी वेगळी भाषा नसल्याचे सांगितलं. आयोगाने अकाली दलाच्या मागणीला विरोध केला. त्यानंतर अकाली दलाने एक आंदोलन सुरू केलं याला ‘पंजाबी सूबा’ आंदोलनही बोललं जातं. या आंदोलनामध्ये पंजाब सरकारने वीस हजारांपेक्षा जास्त लोकांना अटक केली गेली होती. इंदिरा गांधी यांनी 1966 मध्ये पंजाब राज्य पुनर्रचना कायदा मंजूर करण्याचा निर्णय घेतला. पंजाब प्रांताचं विभाजन झालं त्यानंतर हरियाणा आण हिमाचल प्रदेश असं विभाजन करण्यात आलं होतं.
पंजाब आणि हरियाणाची एकच राजधानी
या विभाजनामध्ये पंजाब आणि हरियाणा राज्याची चंदीगड ही एकच राजधानी बनवण्यात आली. तर काही भागीत शीख लोकं जास्त असुनही तो भाग हरियाणा राज्यात समावेश केला गेला. पंजाब आणि हरियाणामध्ये पाणी प्रश्नही पेटला होता. यादरम्यान शीख समूहाचं नेतृत्त्व करणाऱ्या अकाली दलकडून आनंदपूर साहिबमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये अनेक निर्णयांनंतर एक प्रस्ताव मंजुर करण्यात आला. या प्रस्तावाला आज आनंदपूरसाहिब रिझ्युलिशन म्हटलं जातं. यादरम्यान अकाली आणि निरंकारींमध्ये झालेल्या संघर्षामध्ये अनेकजणांना आपले प्राण गमवावे लागले.
इंदिरा गांधींचा आणीबाणीचा निर्णय आणि सरकार पडलं
इंदिरा गांधी सरकारने 1975 मध्ये आणीबाणी घोषित केली होती, त्यानंतर 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यावेळी देशात जनता दलाची सत्ता आली होती. मात्र हे सरकार पूर्ण वेळ टिकलं नाही. त्यामुळे 1980 मध्ये परत निवडणुका घेण्यात आल्या, यावेळी अकाली दलविरोधात काँग्रेसला पंजाबमध्ये चेहरा हवा होता. पंजाबने काँग्रेसमधून वीस लोकांची यादी दिल्लीला पाठवली आणि या यादीमध्ये जनरल सिंह भिंद्रनवाले याचंही नाव होतं. त्यावेळी काँग्रेसने जनरल सिंह भिंद्रनवाले याची निवड केली होती. धर्मप्रसारक असणारा जनरल सिंह भिंद्रनवाले निवणडणुकीमधील सभांच्या व्यासपीठावर भाषणे देऊ लागला होता.
जनरल सिंह भिंद्रनवाला याच्या डोक्यावर काँग्रेसचा हात असल्याने त्यानी आपली दहशत पसरवायला सुरवात केली. भिंद्रनवाला आपल्यासोबत हत्यारधारक लोकांना ठेवू लागला. हळू-हळू तो फौज घेऊनच फिरू लागला होता. त्या काळात अत्याधुनिक आणि बाजारातील स्टेन गन त्याच्या अनुयांयीकडे होती. त्यामुळे भिंद्रनवाला याचा सीमेबाहेरून कोणाचा तरी आधार असल्याची चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली. काही दिवसांनंतर तो काँग्रेससाठीच मोठी डोकेदुखी ठरू लागला होता. पंजाबमध्ये 80 च्या काळात दहशतवाद्यांची जोरदार चर्चा होत होती.
पंजाब केसरींच्या संपादकांची हत्या
1981 मध्ये पंजाब केसरी वृत्तपत्र समूहाचे संपादक लाला जगत नारायण यांची हत्या करण्यात आली होती. पंजाब केसरी वृत्तपत्रात भिंद्रनवालाविषयी उघडपणे लिहिले जात होतं. त्यामुळेच लाला जगत नारायण यांना मारण्यात आल्याचं ब्रिगेडियर म्हणाले. या काळातच जालंधर, तरनतारन, अमृतसर, फरीदकोट आणि गुरुदासपूर येथे झालेल्या हिंसक घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. या सगळ्यात भिंद्रनवालेचं नाव समोर आलं. इतकंच नाहीतर भिंद्रनवाले याला दहशतवादी आणि पाकिस्तानमधून मदत मिळत असल्याचंही बोललं जातं.भिंद्रनवालेची वाढता ताकद पाहता अकाली दलानेही त्याला पाठिंबा द्यायला सुरूवात केली. कारण हा भिंद्रनवालेला काहींसाठी काळ तर काहींसाठी संत होता. त्याचे समर्थकही मोठ्या प्रमाणात वाढले होते.
भिंद्रनवालेचा अकाल तख्तवर ताबा
1982 मध्ये भिंद्रनवालेने चौक महता गुरुद्वारा सोडलं आणि सुवर्ण मंदिर संकुलातील गुरू नानक निवासमध्ये वास्तव्य केलं. 15 डिसेंबर 1983 ला भिंद्रनवालेने शीख धर्मामध्ये सर्वोच्च मानलं जाणाऱ्या अकाल तख्तवर ताबा मिळवला. भिंद्रनवाले याला माहित होतं की आता भारत सरकार काही शांत बसणार नाही. पंजाबमधील पोलीस असून नसल्यासारखे झाले होते. ज्यावेळी भिंद्रानवाले सुवर्ण मंदिरात होता त्यावेळी त्याने पोलिसांना 200 मीटर दूर थांबायचं असा धमकीवजा इशाराज दिला होता.
पंजाब DIG सुवर्ण मंदिरात हत्या
पंजाबमध्ये पहिला हल्ला 1982 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री दरबारा सिंह यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर 23 एप्रिल 1983 मध्ये डीआयजी एएस अटवाल यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी आलेल्या डीआयजींवर हरमंदिर साहिह परिसरात पायऱ्यांवर गोळी मारून त्यांची हत्या केली गेली. पंजाबच्या डीआयजींच पार्थिव त्या ठिकाणी दोन तास पडून होतं. ते पार्थिव उचलण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. यावरून भिंद्रानवाला याची दहशत किती होती हे दिसून आलं. त्यानंतर पंजाबमधून दिल्लीकडे जाणाऱ्या एका बसमध्ये घुसून लोकांना त्यांची नावे विचारून हिंदु लोकांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पंजाबमधील काँग्रेस पक्षाचेच सरकार बरखास्त करत राष्ट्रपती राजवट लागू केली. कारण पंजाबमधील हालचाली बिघडत चालल्याने दिल्लीमधील हायकमांड अस्वस्थ झालं होतं. पंजाब भारताच्या हातून जातं की काय अशीही परिस्थिती निर्माण झालं होती. अखेर इंदिरा गांधी यांनी इच्छा नसताना ऑपरेशन ब्लू स्टार करण्याचा निर्णय घेतला.
ऑपरेशन ब्ल्यू स्टार
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार करण्याचा निर्णय 1 जून 1983 साली घेतला. 1 जूनला पंजाबमध्ये कर्फ्यू लावण्यात आला. पंजाबकडे जाण्याच्या सर्व गाड्या रद्द केल्या गेल्या. या ऑपरेशची सर्व जबाबदारी लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्यावर सोपवली होती. सशस्त्र जर्नेल सिंग भिंद्रनवाले, कोर्ट-मार्शल केलेले मेजर जनरल सुभेग सिंग आणि शीख स्टुडंट्स फेडरेशनच्या सेनानींनी सुवर्ण मंदिर परिसराभोवती एक मोठा बॅरिकेड उभारला होता. सुवर्ण मंदिरातील अकाल तख्तमध्ये सर्व मोठ्या प्रमाणात दारूगोळा पोहोचवला गेला होता.
इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारबाबत कमालीची गुप्तता ठेवली होती. गृहमत्र्यांनाही या ऑपरेशनबाबत कोणती माहिती नव्हती. आर्मी ऑपरेशनसाठी पूर्ण तयार होती, 3 जूनपर्यंत आर्मीने मंदिराच्या सर्व बाजूने सैनिक तैनात केले. इंदिरा गांधी यांनी पंजाबसोबतच इतर कुठेही संपर्क होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था बंद केल्या. रेल्वे, बस आणि विमानांना येथे बंदी घालण्यात आली होती. इतकंच नाहीतर त्या ठिकाणी असलेल्या सर्व पत्रकारांना एका बसमध्ये बसवून माघारी पाठवण्यात आलं. कॅप्टन ब्रार यांनी 4 जूनला आपल्या एका अधिकाऱ्याला साध्या वेशात मंदिरात जाऊन तेथील परिस्थितीचा अंदाज घ्यायला लावला. भिंद्रनवाले याला असं वाटत होतं की कितीही काही झालं तरी कोणीच सुवर्ण मंदिरावर हल्ला करणार नाही. तो आपल्या अनुयायांनाही तेच सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढवत होता.
जनरल कुलदीप सिंग ब्रार सांगितला ऑपरेशनचा थरार
5 जूनलाऑपरेशनमधील सैनिकांना पहाटे 4.30 वाजता मी ब्रीफ केलं. तुम्ही मंदिरामध्ये गेल्यावर असा विचार नका करू की इथे आपण पावित्र्य घालवत आहोत. उलट आपण इथे स्वच्छता आहोत. पण ज्यांना कोणाला आतमध्ये नसेल यायचं नसेल तर त्यांनी येऊ नका. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यावेळी एका बटालियनमधील अधिकारी उभे राहिले. म्हणाले, मी अकाल तख्तकडे जाणार आणि भिंद्रनवाले याला पकडणार. त्यानंतर ते अधिकारी आत शिरले मात्र आत जाताच त्यांच्यावर मशीन गनने हल्ला चढवला. पण त्यांनी हार मानता संघर्ष करत राहिले. त्यांच्या पायांवर गोळ्या मारण्यात आल्या होत्या की त्यांचं पाय निखळले पण ते अधिकारी थांबले नाहीत. शेवटी ते अकाल तख्तकडेच रांगत निघाले होते. शेवटी त्यांच्या कमांड अधिकाऱ्याला जबरदस्तीने रूग्णालयात नेण्यात आलं. या अधिकाऱ्याला पुढे अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आल्याचं ब्रार यांनी सांगितलं.
आतमध्ये पूर्ण तटबंदी केली होती, पाऊनतासामध्येच आम्हाला भिंद्रनवालाच्या तयारीचा अंदाज आला. अकाल तख्तच्या खिडक्या सर्व जागा त्यांनी बुजवल्या होत्या आणि फक्त त्यांना निशाणा साधता येईल अशी पोकळी ठेवली होती. त्यामुळे आम्हाला प्रतिकार करणं अवघड जात होतं. आम्ही असे ग्रेनेड फेकले ज्याच्या धुरामुळे डोळ्यांना त्रास होतो काही दिसत नाही. पण ते आमच्याच सैनिकांवर उलटे पडत होते. कारण ते भिंतीला खिडक्यांना धडकून सैनिकांच्या अंगावर येत होते. इतकंच नाहीतर चीनमध्ये बनलेल्या रॉकेट लाँन्चरचा वापरही भिंद्रनवालाकडून करण्यात आला होता. त्यानंतर आम्ही टँकच्या प्रखर हॅलोजनच्या लाईटचा वापर केला. या लाईटची प्रखरता इतकी असते की डोळे लिपले जातात. लाईटने भिंद्रनवालाच्या लोकांना काही दिसू नये, त्यांना नेम साधता येऊ नये आणि यादरम्यान सैनिक अकाल तख्तच्या जवळ जातील. अशी आमची योजना होती मात्र काहीच यशस्वी होत नव्हतं. सकाळ होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला होता. जर सकाळी पंजाबमधील लोकांना समजलं असतं की असं काही घडत आहे तर जनतेने आम्हाला वेढा देऊन ऑपरेशन पूर्ण होऊ दिलं नसतं. अखेर दिल्लीत फोन फिरवण्यात आला आणि टँकने हल्ला करण्याची परवानगी मिळाली.
जनरल ब्रार यांनी सुवर्ण मंदिरात रनगाडे घुसवले
अकाल तख्तचा वरचा जो भाग आहे त्यावर टँकने फायरिंग करण्याचं ठरलं होतं. या योजनेचा हेतू असा होता की हल्ला केल्याने आतमध्ये दगडी पडतील आणि तख्तमधील बाहेर पडतील. भारतीय सेनेने टँकने अकाल तख्त जोरदार हल्ला चढवला. (जेव्हा जगजीत सिंह अरोडा यांनी सुवर्णमंदिर दौरा केला आणि सांगितलं की भारतीय सैन्याने जवळपास 80 गोळ्यांचा मारा केला होता.) सकाळ झाल्यावर अचानक अकाल तख्तमधून मोठ्या प्रमाणात भिंद्रनवालाचे लोक बाहेर पडले. तेव्हा ब्रार यांच्या लक्षात आलं की आतमध्ये काहीतरी मोठं झालं आहे. त्यादरम्यान सैनिकांवर होणारी फायरिंगही थांबली होती. आम्ही आमच्या मोजक्या सैनिकांना आतमध्ये पाठवलं. तर त्यावेळी भिंद्रनवालाचा मृत्यू झाल्याची खात्री त्यांनी केली. 7 जूनला भिंद्रनवाला यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.
भिंद्रनवाले जिवंत असल्याची अफवा
देशात या हल्ल्याविषयी सर्वांना समजलं होतं. तर पाकिस्तानमध्ये टीव्हीवर भिंद्रनवाले हा जिवंत असल्याचं सांगितलं जावू लागलं. भारतीय सैन्य आक्रमण करत असताना तो पाकिस्तानमध्ये पळून गेल्याची अफवा उडाली. 30 जूनला पाकिस्तानच्या टीव्हीवर त्याला दाखवलं जाणार असल्याचंही सांगितलं जावू लागलं होतं. सैनिकांनी त्याला ठार केल्याचं हे माहित असतानाही पंजाबमधील त्याचे समर्थक चमत्कार होईल अशा आशेने टीव्ही लावून बसले होते. 30 जूनला तारखेला लोकांनी वाट पाहिली मात्र ती फक्त अफवाच राहिली. या हल्लात भारतीय सैन्याचे 4 अधिकारी, 87 सैनिक शहीद, 12 अधिकारी आणि 237 सैनिक या ऑपरेशममध्ये जखमी झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर इतक्या कमी वेळात 80 पेक्षा जास्त सैनिक जाण्याची पहिलीच वेळ होती. या हल्ल्यामुळे शीख समूदाय नाराज झालाच होता. त्यासोबतच भिंद्रनवाला याच्या समर्थकांना मारल्याचा बदलाही त्यांना पूर्ण करायचा होता.
इंदिरा गांधी यांची सुरक्षारक्षकांकडून हत्या
इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोंबर 1984 साली त्यांच्या शीख अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. बेअंत सिंह आणि सतवंत सिंह अशी हल्ला केलेल्या आरोपींची नावे आहेत. यामधील बेअंत सिंह याला त्याच ठिकाणी मारण्यात आलं होतं. केहर सिंह नावाच्या आणखी एका शीख व्यक्तीला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. हे प्रकरण कोर्टात गेल्यावर अखेर 6 जानेवारी 1989 रोजी सतवंत सिंह आणि केहर सिंह यांना फाशी देण्यात आली. बाहेर पुन्हा याचे पडसाद उमटे नयेत किंवा दंगलीसारखाी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून या आरोपींवर जेलमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणऱ्या इंदिरा गांधी यांना पंजाब वाचवण्यासाठी घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आपल्या प्राणांची आहुत द्यावी लागली.